रोशनी शिंदे मारहाण प्रकरण : राज्य महिला आयोगाने ठाणे आयुक्तांना दिले आदेश…
Roshni Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ३) रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यावरून मोठा राडा झाला. यामध्ये ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहाच…शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
ठाणे शहरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ०३) रोजी तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटातील युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
‘महाविकास आघाडी मजबूत, निवडणुकीत ताकद दिसेल’; चव्हाणांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
मात्र, ठाणे पोलिसांनी साधा गुन्हा दाखल केला नाही. ठाणे पोलीस आयुक्तांच्या निष्क्रियता दिसून येत आहे. ते पक्षपातीपणा करत आहेत. त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाँ. जितेंद्र आव्हाड यांनी हे बुधवारी (दि.५) दुपारी ३ वाजता मोर्चा देखील काढला होता. मात्र, तरीदेखील अद्याप याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांनी साधा गुन्हा दाखल केलेला नाही.
आता याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत थेट ठाणे पोलीस आयुक्तांना चैकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना व्यक्तिश: उपस्थित राहुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांच्या वतीने पोलीस निरीक्षक हा अहवाल घेऊन राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात निघाले आहेत. आता याप्रकरणात राज्य महिला आयोग काय करणार याकडे लक्ष लागले आहे.