आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून शरद पवार गट आक्रमक; गद्दारीचा महामेरू म्हणत व्हिडीओ शेअर…
Shivajirao Aadhalrao : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. ( Shivajirao Aadhalrao ) परंतु, आढळराव शिंदे गटात होते. मग काय, दोन्ही गटांनी विरोध बाजूला सारला आणि आढळरावांचा पक्षप्रवेश नक्की झाला. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आढळरावांवर एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आढळरावांना थेट गद्दारीचा महामेरू म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.
काय आहे हा व्हिडीओ?
हा व्हिडीओ पोस्ट करताना प्रशांत जगताप यांनी लिहिलं आहे की, गद्दारीचा महामेरू…! आज एवढे सिनियर गद्दार येताय म्हटल्यावर यांचा इतिहास पाहता मलिदा गँग मधील ज्युनिअर गद्दारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, गद्दारीचा महामेरू शिवाजीदादा गद्दारी तुमच्या रक्तातच आहे. अनेक वर्षाच्या मित्रांशी म्हणजे वळसे पाटलांशी गद्दारी करून शिवसेनेमध्ये आलात आणि खासदार झालात. 2004 च्या निवडणुकीत ज्या अॅडव्होकेट राहणे यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी केलं. त्यांना तुम्ही विधानसभा निवडणुकी कारस्थान करून पाडलं. तसेच जिल्हाप्रमुख पदावरूनही हटवलं.
गद्दारीचा महामेरू…!
आज एवढे सिनियर गद्दार येताय म्हटल्यावर यांचा इतिहास पाहता मलिदा गँग मधील ज्युनिअर गद्दारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. pic.twitter.com/ivL2M5HUza— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 26, 2024
आमदार शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयावर कर्जतकर नाराज…कर्जत बंद ठेवत केला निषेध
जिल्हाप्रमुख सुनील मेहर यांनाही कारस्थान करून पदावरून काढले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत गरज संपल्यानंतर उमेश चांदगुडे यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढले . विधानसभा निवडणुकीत खेडमधून शिवसेना उमेदवार अशोक खांडेभरार यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा करून शिवसेनेचा उमेदवार पाडला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवारी मिळवूनही आशाताई बुचके यांच्यासाठी शरद सोनवणे यांचा विश्वासघात केला आणि 2019 ला त्याच शरद सोनवणेंसाठी आशाताई बुचके यांची पक्षातून हकालपट्टी केली.
अजित पवार गटाला सात जागा मिळणार? सातारा, परभणी, नाशिकच्या जागेवर ठोकला दावा
जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे यांना पदावरून आणण्याचा कारस्थान केलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अतुल देशमुख यांना उमेदवारीचं आश्वासन देऊन फसवलं. 2009 मध्ये सुरेश भोर यांना शिवसेनेचे उमेदवारी मिळूनही पत्नीचे उमेदवारीसाठी दगा दिला. विधानसभा निवडणुकीत जयसिंग एरंडे यांना शब्द देऊन त्यांची प्रसन्न केले. तीन वेळा खासदार करूनही शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाले. तर आता शिंदे गटात असून उमेदवारी मिळत नाही. म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेलात. मग गद्दार कोण? ज्या वळसे पाटील आणि अजितदादांना वीस वर्ष शिव्या दिल्या. उमेदवारीसाठी त्यांच्याच पाया पडला. त्यामुळे तुमच्या शिवाजी नाव असून उपयोग नाही. तुमच्यात स्वाभिमाना अजिबात नाही. असं म्हणत शरद पवार गटाकडून आढळरावांवर जोरदार निशाणा साधला आहे.