अजित पवार गटाला सात जागा मिळणार? सातारा, परभणी, नाशिकच्या जागेवर ठोकला दावा
Ajit Pawar Group Loksabha Seats : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार असून पुढील काही दिवसांतच जागावाटपाची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) सात जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने सातारा, परभणी आणि नाशिकच्या जागेवरही दावा ठोकला आहे. त्यामुळे आता महायुतीतून अजित पवार गटाला या जागा मिळतील की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शरद पोंक्षे यांचा मुलगा पहिल्यांदाच वडिलांसोबत सिनेमात झळकणार; लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणाही केली होती. त्यावरुन चांगलाच गदारोळ झाला. आता अजित पवार गटानेही नाशिकच्या जागेवर दावा ठोकल्याने नाशिकची जागा अजित पवार गटाकडे जाणार की शिंदे गटाकडे हे अद्याप अस्पष्टच आहे. तसेच साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी भाजपकडे आधीच गळ घातलीयं, मंत्री अमित शाहांनीही भोसलेंना शब्द दिलायं, मात्र अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यात आता अजित पवार गटाने दावा ठोकल्याने महायुतीत मोठा पेच निर्माण होणार आहे.
अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली आहे. पुण्यात आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. या बैठकीत शिरूर, बारामती, सातारा, धाराशिव, परभणी, नाशिक, रायगड या जागांवर बैठकीत चर्चा झाली असून 6 जागा नक्की झाल्या असून परभणीसंदर्भात येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. अजितदादांच्या दाव्यानंतर आता अजित पवार गटाला लोकसभेच्या 7 जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.
Ahmednagar loksabha Election : लंकेंचं तळ्यात-मळ्यात तर विखेंकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी…
महादेव जानकर यांना पाठिंबा ही केवळ अफवा असून ती विरोधकांनी पसरवली असल्याचंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच बारामती लोकसभेबाबतही अजितदादांनी उमेदवार बदलणार नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. बारामतीमध्ये अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणारे विजय शिवतारे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचंही अजितदादांनी सांगितलं आहे.
Loksabha उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर नतमस्तक पाहा फोटो
दरम्यान, बैठकीत अजितदादांनी लोकसभा निवडणूकीची राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असून प्रत्येक आमदारासोबत पाच ते सहा जणांची टीम काम करार आहे. यामध्ये महायुतीचे जिथे उमेदवार तिथे समन्वयक ठरवण्यात आले आहेत. जागावाटपाबाबत 99 टक्के काम पूर्ण झालं असून येत्या २८ तारखेला जागांची घोषणा करणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.