Ahmednagar loksabha Election : लंकेंचं तळ्यात-मळ्यात तर विखेंकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी…

Ahmednagar loksabha Election : लंकेंचं तळ्यात-मळ्यात तर विखेंकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी…

Ahmednagar loksabha Election : लोकसभेचे (Loksabha Election 2024)बिगुल वाजले असून राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. यातच अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीकडून (Ahmednagar loksabha Election)सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र लंके यांनी अधिकृत शरद पवार यांच्या गटात प्रवेश न केल्याने त्यांच्या उमेदवारीवरुन शंका उपस्थित केली जात आहे. नुकतेच लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी दोघांपैकी एकजण निवडणूक लढवणार असे जाहीर केले. एकीकडे निलेश लंके हेच विखेंविरोधात उमेदवार असतील, अशी चर्चा असताना राणी लंके यांच्या या विधानाने लंकेची उमेदवारी तळ्यात-मळ्यात असल्याचे समोर येत आहे.

मराठ्यांनंतर धनगर समाजानेही रान पेटवलं; 15 मतदारसंघात निवडणूक लढणार…

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांकडून गेल्या वर्षभरापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली होती. विद्यमान खासदार सुजय विखे यांनी देखील गेल्या काही महिन्यांमध्ये साखर, डाळ वाटपाच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात साखरपेरणी करुन ठेवली होती. यानिमित्ताने त्यांनी जनसंपर्क देखील वाढवला. मात्र पक्षातूनच आमदार राम शिंदे यांनी लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केल्याने त्यांची अडचण वाढली होती. मात्र पक्षाकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि महायुतीच्या जागेचा तिढा सुटला. उमेदवारी जाहीर होताच विखे यंत्रणा निवडणुकीच्या तयारीला देखील लागली. सुजय विखे यांनी देखील गावोगावी विविध माध्यमातून जनसंपर्क वाढवला. मतदार संघांमध्ये नेतेमंडळींनी भेटीगाठी घेत मतांची जुळवाजुळव करु लागले आहेत.

Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये ‘बिग बॉस’ स्टार्सची मांदियाळी, पाहा फोटो

तर दक्षिणेमध्ये सुजय विखे यांच्या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीमधून उमेदवार कोण असणार? यावर चर्चा रंगू लागली. यातच लोकसभेसाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करत असलेले अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे रिंगणात उतरले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवत लोकसभेची मतपेरणी सुरु केली. यातच गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी शरद पवार यांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रमाण देखील वाढवले. अनौपचारिक त्यांनी तुतारी जी शरद पवार गटाचे पक्ष चिन्ह देखील हाती घेतले. यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र अधिकृतरित्या त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. यामुळे अद्याप तरी विखेंविरोधात माविआचा उमेदवार ठरलेला नाही असेच दिसून येत आहे.

राणी लंकेंच्या विधानाने वेगळीच चर्चा :
आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील काही दिवसांपूर्वी नगर दक्षिणेमधून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली होती. या
माध्यमातून एकप्रकारे लोकसभेची तयारी सुरु होती. यातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके यांची उमेदवारी फायनल मानली जात होती आणि तेच निवडणूक लढवतील असे वातावरण देखील निर्माण झाले. मात्र अजित पवार यांची साथ सोडत लोकसभा लढवणे हे निलेश लंके यांना काहीसे जड वाटू लागले आहे. यामुळे लंके हे स्वतः पेचात सापडले आहे.

मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा राणी लंके यांनी माध्यमांसमोर उमेदवारीबाबत महत्वाचे विधान केले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून निलेश लंकेच निवडणूक लढवणार असे राणी लंके म्हणाल्या. निलेश लंके किंवा मी स्वतः असे म्हणत त्यांनी देखील लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. मात्र उमेदवाराचे नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. यामुळे महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. असे असले तरी मात्र शरद पवार हे स्वतः देखील निलेश लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. जर लंके स्वतः उमेदवार नसतील तर राणी लंके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

विखेंना महायुतीचे पाठबळ
विखेंच्या विजयासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. यातच राम शिंदे व विखे कुटुंबियांमधील वाद देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या मध्यस्थीने संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिंदे यांचे पाठबळ देखील विखे यांना मिळणार आहे. यातच अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात जाणार असलेल्या लंके यांच्या पराभवासाठी अजितदादांनी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या संवाद मेळाव्यातून शिवसैनिकांना विखेंच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सुजय विखे यांना महायुतीमधून पाठबळ वाढताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज