मराठ्यांनंतर धनगर समाजानेही रान पेटवलं; 15 मतदारसंघात निवडणूक लढणार…

मराठ्यांनंतर धनगर समाजानेही रान पेटवलं; 15 मतदारसंघात निवडणूक लढणार…

Loksabha Election : धनगर समाजाला आरक्षणापासून (Dhangar Reservation) दूर ठेवले आहे. तसेच सत्तेमध्ये योग्य लोकप्रतिनिधीत्वही मिळत नाही. राज्यात राजघराण्यातील व्यक्तींना संधी दिली जात असताना धनगर समाजतही राजे होते, याचा विचार कोणी केला नाही. आमदार राम शिंदे नगरमधून जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता यशवंत सेनेतर्फे (Yashwant Sena) राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) निवडणूक लढण्यात येणार असल्याची घोषणा यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केली. त्यामुळे मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

‘आता योग्य वेळ आलीये..’; 4 राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या बॉलिवूडची ‘क्वीन’ची राजकारणात एन्ट्री

अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेऊन यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौडतले यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांशी बोलताना दोडतले म्हणाले, राज्यात 30 हुन अधिक लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची जास्त ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागा वाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदारसंघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पाने पुसली आहेत.

Police Bharti 2024 : ठाणे पोलीस दलात ६८६ रिक्त पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याऐवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा जास्त प्रभाव असलेल्या अहमदनगर, शिर्डी, नाशिक, माढा, सोलापूर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, यवतमाळ, सातारा व जालना या 15 मतदारसंघात यशवंत सेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असेही दोडतले यांनी सांगितले.

Wardha Lok Sabha : कॉंग्रेसचा नेता तुतारी फुंकणार! कराळे मास्तर ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब

दोडतले म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, यासाठी आम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पहिल्यांदा 21 दिवस उपोषण केले. आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेतले. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा उपोषण केले. मात्र आरक्षण देण्याबाबत दोन वेळा सरकारकडून शब्द देऊनही शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube