धनगर आरक्षणासाठी निलंगेकरांनी विधानसभेतही उठवला होता आवाज; महायुतीचं सरकार आल्यावर प्रश्न सोडवण्याचं आश्वासन
Sambhaji Patil Nilangekar on Dhangar reservation : महायुती सरकारनेच धनगर समाजाचा सन्मान केला आहे. (Dhangar reservation) आरक्षणाचा प्रश्नही महायुती सरकारच निकाली काढेल. सरकार आल्यानंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असा विश्वास संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. (जुलै 2024)मध्ये झालेल्या अधिवेशनात निलंगेकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावेळी अनेक धनगर बांधव लातूर येथे उपोषणासाठी बसले होते. त्यांची मागणी ही धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षणाचा लाक्ष मिळावा ही आहे. त्या मागणीकडे सभागृहाने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा याबद्दल निलंगेकर यांनी सभागृह दणाणून सोडलं होत. त्याचमुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी निलंगेकर यांना आपला पाठिंबा देत आपण त्यांच्या मागणीसाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत असंही सांगितलं होत.
Dhangar reservation: धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास
दरम्यान, निलंघेकर यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा शब्द दिला आहे. शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला. ही चूक महायुती सरकारने दुरुस्त केली. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मी विधानसभेतही आवाज उठवला होता. भविष्यात महायुती सरकारच सत्तेत येणार असून या समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
निलंगा मतदारसंघात समाजाला योग्य तो सन्मान देण्याचं काम आपण केलं आहे. या समाजाला राजकीय पाठबळ दिलं. निलंग्याच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती म्हणून शिवाजीराव चेंडकापुरे, लातूरच्या उपमहापौरपदी देविदास काळे यांना संधी दिली. यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मतदारसंघातील गौडगाव येथे अहिल्यादेवींचा पुतळा उभारला. केळगाव व देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथे लवकरच पुतळे उभारले जाणार आहेत. असं आश्वासनही निलंगेकर यांनी दिलं.