व्यापारी वर्गामुळे आपल्या निलंगा मतदारसंघाचा आर्थिक विकास; संभाजी पाटील निलंगेकरांच प्रतिपादन
Sambhaji Patil Nilangekar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा मतदारसंघातील सर्व व्यापारी बांधवांचा स्नेह मेळावा अजंठा थिएटर, निलंगा येथे संपन्न झाला. यावेळी निलंगा मतदारसंघाच्या विकासामध्ये कायम योगदान देणाऱ्या सर्व व्यापारी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करत, आगामी निवडणुकीमध्ये सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा यावेली भाजप उमेदवार (Sambhaji Patil) संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
आपण सर्व व्यापारी वर्गामुळेच आज आपल्या निलंगा मतदारसंघाचा आर्थिक विकास होत असून, मतदारसंघातील तीनही तालुके भरभराटीला आले आहेत. त्यामुळे, आपल्या सर्वांचे येथील अर्थव्यवस्थेतील महत्त्व ओळखूनच भाजपा-मह्युती ही कायमच व्यापारी बांधवांच्या हितामध्ये भूमिका घेत आली आहे. मी देखील कायमच आपल्या विकासाची आणि आपल्या सर्वांना सहकार्याची भूमिका घेतली आहे. निलंगा मतदारसंघामध्ये व्यापारी बाजारपेठ विकसित व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत असंही निलंगेकर यावेळी म्हणाले.
विविध संघटना संभाजी पाटील निलंगेकरांच्या पाठीशी.. विजयाचा मिळाला विश्वास
मतदारसंघात असलेल्या बाजार समितीचा कारभार सुरळीत चालून शेतकरी-व्यापाऱ्यांना त्याचा लाभ व्हवा. त्यांची भरभराट व्हावी यासाठी आपण नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. आज आपण सर्व पाहत आहोत की आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उलाढाल आज या बाजार समित्या करत आहेत. मतदारसंघाला असेच पुढे घेऊन जात आपल्या सर्वांसाठी अधिक सुरक्षित, संपन्न आणि विश्वासार्ह वातावरण तयार करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विकासाच्या पाठीशी उभे राहत येत्या २० तारखेला भाजपा महायुतीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून, आपला लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाच्या आणि आपल्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची संधी पुन्हा एकदा द्यावी, अशी विनंती सर्वांना केली. यावेळी डॉ. एम.के. सायगांकर जी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हादजी बाहेती, तानाजीरावजी माकणीकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, माजी न.प. सभापती इरफानजी सय्यद, माजी उपनगराध्यक्ष मनोजजी कोळ्ळे, माजी जि.प. सभापती संजयजी दोरवेदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.