विविध संघटना संभाजी पाटील निलंगेकरांच्या पाठीशी.. विजयाचा मिळाला विश्वास

विविध संघटना संभाजी पाटील निलंगेकरांच्या पाठीशी.. विजयाचा मिळाला विश्वास

Elections 2024 : निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघात (Sambhaji Patil Nilangekar) जोरदार प्रचार सुरू आहे. चौकसभा आणि रॅलींनी वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रचाराच्या माध्यमातून निलंगेकर नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचार सभा आणि रॅलींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहती केली आहे. आगामी काळातही विकासाचा पॅटर्न घडावा यासाठी निलंगेकर यांना या विधानसभा निवडणुकीत विविध संघटनांच्यावतीने जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. या संघटनांच्या पाठिंब्यामुळे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार लोकहिताच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले आहे. त्याचबरोबर विकासाच्या योजनाही मोठ्या प्रमाणात साकारल्या जात असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगानेच निलंगा मतदारसंघातील केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत.

संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास : भारतबाई सोळुंके

विशेष म्हणजे लोकहिताच्या अनेक योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक समाजघटकांना होत आहे. आगामी काळातही ही विकासाची गंगा वाहती राहून लोकहिताच्या आणखी योजना अंमलात आणायच्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या सरकारमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांची वर्णी लागणे तितकेच गरजेचे असल्याने त्यांच्या विजयासाठी विविध संघटना त्यांना जाहीर पाठींबा देत आहेत.

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना जाहीर पाठिंबा देणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय बहुजन पार्टी, सगर (गवंडी समाज), ओबीसी हक्क परिषद, माळी महासंघ, स्वराज्य सेना, भारतीय फायटर सेना, खाकी फाऊंडेशन यांसह विविध संघटनांचा समावेश आहे. या संघटनांच्या राष्ट्रीय व प्रदेशाध्यक्षांनी आपल्या जाहीर पाठिंब्याचे पत्र आ. निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्याचबरोबर या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. निलंगेकर यांच्या विजयासाठी पूर्णपणे आपली ताकद त्यांच्या पाठिशी उभी करण्याचा संकल्प केला आहे.

फडणवीसांना रिजल्ट दिला अन् रेल्वे कोच मिळाला, निलंगेकरांनी सांगितली लातुरची नवी ओळख

follow us
  • fb
  • instagram
  • youtube