राज्याच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीलाच साथ द्या; संभाजी पाटील निलंगेकरांच मतदारांना आवाहन
Sambhaji Patil Nilangekar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचे हात मजबूत करण्यासाठी व विकसित महाराष्ट्राच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी साकोळ येथील शेकडो तरुण तडफदार युवकांनी निलंगा येथील निवासस्थानी भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. (Sambhaji Patil) प्रसंगी संभाजी पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं.
विविध लोककल्याणकारी योजना राबवत विकसनशील भूमिका घेऊन महाराष्ट्र हितासाठी कार्यरत असणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील सर्वांचीच मने जिंकली आहेत. याच कारणास्तव सर्वच स्तरातील नागरिकांचा भाजपकडे कल वाढला आहे. राज्याच्या उज्वल भविष्यासाठी महायुती हाच पर्याय असल्याने हजारोंच्या संख्येने युवक भाजपासोबत जोडले जात आहेत. युवकांची हीच शक्ती राज्यात महाविजय घडवून आणेल व पुन्हा एकदा राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे महायुती सरकार येईल हा विश्वास आहे असंही निलंगेकर यावेळी म्हणाले आहेत.
व्यापारी वर्गामुळे आपल्या निलंगा मतदारसंघाचा आर्थिक विकास; संभाजी पाटील निलंगेकरांच प्रतिपादन
निलंगा मतदारसंघाच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देणाऱ्या व्यापारी बांधवांचा मेळावा औराद शहाजणी येथे पार पडला. प्रसंगी व्यापारी बांधवांचे संभाजी पाटील यांनी कार्याबद्दल आभार व्यक्त केले व मतदारसंघाच्या विकासामध्ये अधिकाधिक योगदानाची व आगामी निवडणुकीमध्ये पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. निलंगा मतदारसंघाच्या आर्थिक विकासामध्ये व्यापारी बांधवांचे महत्वाचे योगदान आहे असंही ते यावेळी म्हणाले.
आज आपला मतदारसंघ एका विशिष्ट उंचीवर येऊन ठेपला आहे. आपल्या महायुती सरकारने देखील व्यापारी बांधवांचे कर्तुत्व आणि महत्व ओळखून त्यांच्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तसंच, वेळोवेळी व्यापारी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत व आगामी काळातही अनेक उपयोगी निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या आखाड्यात व्यापारी बांधव महायुती सरकारच्या पाठीशी खंबीर राहून महायुतीचे हात मजबूत करतील, अशी इच्छा संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलून दाखवली.