धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

Dhangar reservation : विविध मागण्यांसाठी आलेल्या धनगर समाजाने (Dhangar reservation) आज जालना जिल्हाधिकारी (Jalna News) कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचल्यानंतर प्रशासनाच्यावतीने मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यास कोणीही येत नाही, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये बळजबरीने प्रवेश केला. तसेच कार्यालयाच्या कार्यालयासमोर असलेल्या कुंड्यांची तोडफोड करीत अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तसेच कार्यालयाच्या काचा फोडल्या.

यामुळे परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी उशीर करीत असल्याचा आरोप करत संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली.

फडणवीस नाहीतर तर मग कोण? लाठीचार्जवर मनोज जरांगेंचा खडा सवाल

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली होती. दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला एसटी संवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन 50 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने आज जालन्यात विशाल मोर्चा काढण्यात आला.

आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार होते.परंतु या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी अधिकारी उशिर करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्या संतापातून जिल्हाधिकारी कार्यालयातील काच, कुंड्यांची तोडफोड करत वाहनांची नासधूस केली.

बावनकुळे सातत्याने अडचणीत! पण त्यांच्याविरोधातील ‘मसाला’ माध्यमांना नेमके कोण पुरविते?

आक्रमक झालेल्या धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube