महाराष्ट्राचे नेते व्हायला निघाले… आधी तालुक्यात पाहा; सुजय विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला

महाराष्ट्राचे नेते व्हायला निघाले… आधी तालुक्यात पाहा; सुजय विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला

Sujay Vikhe Patil :  भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे अपहरण (Vikhe) प्रकरणावरून पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केले. हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणामागे रोहित पवारच मास्टरमाइंड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर सुजय विखे यांनी थेट भाष्य केलं. जिल्ह्यात राहून महाराष्ट्राचा पुढारी होण्याचं स्वप्न पाहतात त्यांनी पाहिलं, आपल्या तालुक्याची परिस्थिती काय आहे हे आधी पाहावे. तसंच, मला इतर लोकांसारखं जिल्हयाच्या बाहेर लुडबुड करायची सवय नाही अशा शब्दात सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

लुडबुड करण्याची सवय नाही

ज्या गोष्टी पोलीस चौकशी अधीन आहे यावर मी बोलणे योग्य नाही. तसंच, हा जिल्ह्याच्या बाहेरचा प्रश्न आहे मला इतर लोकांसारखं जिल्ह्याचे बाहेर लुडबुड करायची सवय नाही. जे जिल्ह्याबाहेर फिरत होते ते काही लोक पाचशे मतांनी आले काही पाचशे मतांनी पराभूत झाले त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा माझा त्या नेत्यांना सल्ला आहे. जिल्ह्यात राहून महाराष्ट्राचा पुढारी होण्याचे स्वप्न पाहतात त्यांनी पाहिलं आपल्या तालुक्याची परिस्थिती काय आहे हे आधी पाहावे अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

धक्कादायक! गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण; 7 जण गजाआड

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, काही लोक दररोज माध्यमांमध्ये येऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडत आहे. मात्र तुमचं जिल्ह्यातच काही राहील नाही. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले तिथे तुमचे काही राहिले नाही. गावातील प्रश्न मांडा. तुम्ही ट्रम्प यांच्यावर भाष्य करा आम्हाला अजून वेळ मिळतो आहे. याचे उत्तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा शब्दात विखे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

मी असा पिक्चर रिलीज करणार कि तो सुपरहिट होणार

सत्ताधारी मंत्र्यांची व्हिडीओ बाहेर येत असून यावरून विरोधक सरकारला घेरत आहे. यावर सुजय विखे म्हणाले, आजकाल व्हिडीओ काढणे ही नवीन फॅशन झाली. सगळ्यांकडे व्हिडीओ आहे फक्त तो कधी बाहेर काढायचे याला योग्य वेळ असते. पिक्चर कधी हिट झाला पाहिजे याला वेळ काळ असतो. विकेंडला झाला कि तो हिट होतो. त्यामुळे हे कधीही पिक्चर रिलीज करतात. मात्र आपण असा पिक्चर रिलीज करणार कि तो सुपरहिट होणार असं सूचक विधान सुजय विखे यांनी केले.

वंदे भारत शरद पवारांनी सुरु केली नाही

अहिल्यानगरला वंदे भारत स्टॉप मिळाल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी आपल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे माध्यमांमध्ये म्हंटले. यावर आता माजी खासदार सुजय विखे यांनी देखील भाष्य करत लंके यांना जोरदार टोला लगावला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या प्रयत्नांनी वंदे भारतला अहिल्यानगर रेल्वे स्टेशनला स्टॉप मिळाला. कोणीही यामध्ये श्रेय वाद घेऊ नये. मला या श्रेयवादाच्या लढाईत पडायचे नाही, ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तर हे काम केलेलं नाही आहे.

शरद पवार यांनी वंदे भारत रेल्वे सुरु केलेली नाही. तसेच त्यांनी नगरच्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले नाही. ज्यांना याचे श्रेय घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे मात्र त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानावे आणि प्रत्येक बोर्डवर मोदींचा फोटो लावला. मग कितीही बोर्ड बॅनर झळकवले व श्रेय त्याना दिले तरी यावर आमचे काही आक्षेप नाही. हा श्रेय सुजय विखे यांचा नाही. याचे श्रेय केवळ मोदी यांनाच जाते अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube