18 वर्षात त्यांनी फक्त 5 कोटी खर्च केले, सुजय विखेंचा नाव न घेता थोरातांवर निशाणा

अहिल्यानगर : विरोधकांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आमचा असे, अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी नाव न घेता माजी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
लाडकी बहीण योजना, सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये
भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नान्नज दुमाला येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला नीलमताई खताळ, माजी तालुकाध्यक्ष भीमराव चतर, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ४० वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिलं जात आहे. मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल, त्या दिवशीच मी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे.
डॉ सुजय विखे म्हणाले की, अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे, असं विखे म्हणाले.
नीलम खताळ म्हणाल्या, वर्षानुवर्षं महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. सुजय विखे आणि मंत्री विखे पाटील यांना दिलेला शब्द आमदार अमोल खताल यांनी खरा करून दाखवला आहे. तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
धनश्री-चहलच्या घटस्फोटामागचं खरं कारण समोर;पैसा अन् प्रॉपर्टी सोडताही कशावरून उडाले खटके?
ज्येष्ठ नेते भीमराव चतर यांनी विरोधकांना लक्ष करत सांगितले की, दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांवर टीका करणाऱ्यांनी चार दशके काय केले? आज विकासकामचं उत्तर जनतेसमोर आहे. पाणी हा हक्क असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग पाणीदार झाला.
डॉ. सुजय विखे म्हणाले ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा ठाम विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.