धक्कादायक! गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण; 7 जण गजाआड

धक्कादायक! गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण; 7 जण गजाआड

Gopichand Padalkar Worker Sharnu Hande : सोलापुरातून एक धक्कादायक बातमी (Solapur News) समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाइल अपहरण झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला. त्यामुळे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. शरणू हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मला अतीव दुःख आहे, दिलगिरी व्यक्त करतो, विधानभवन राड्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर

यातील मुख्य संशयित आरोपीने याआधी आमदार पडळकर यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हा संशयित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार्यकर्त्याला वाचवण्यात यश मिळाले. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी शरणू हांडे गंभीर अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला सोलापुरात आणून दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, आता आमदार गोपीचंद पडळकर स्वतः कार्यकर्ता आणि पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मु्ख्य संशयित आरोपी अमित सुरवसे याने 2021 मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. याचा बदला म्हणून काही दिवसांपूर्वी शरणू हांडे याने अमित सुरवसेला मारहाण केली होती अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. या मारहाणाची व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोघांनीही आपसातील वाद मिटवला होता. परंतु, याच वादामुळे शरणू हांडेचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शरणू हांडे याचे अपहरण नेमके कोणत्या कारणामुळे झाले, यामागे जुन्या वादाची काही पार्श्वभुमी आहे का याची माहिती पोलीस तपासातून समोर येईल. परंंतु, या घटनेने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यवत प्रकरण म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; रोहित पवारांचा जगतापांसह पडळकरांवर हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube