यवत प्रकरण म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; रोहित पवारांचा जगतापांसह पडळकरांवर हल्लाबोल

Yavat case is an attempt to political Profite Rohit Pawar attacks Jagtap and Padalkar : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथे महामानवाच्या पुतळ्याची विटंबना व आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या ठिकाणी संग्राम जगताप व गोपीचंद पडळकर यांनी देखील सहभागी घेतला व त्यानंतर त्या ठिकाणी वातावरण चिघळले. गावात जातीय सलोखा टिकला पाहिजे. असे सर्व धर्मीय गावकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान दंगल झाली तर केवळ दुकान व घर ही गरिबांची जळतात. मात्र काही राजकारणी आपली राजकीय पोळी भाजण्याचा यातून प्रयत्न करतात. असा सणसणीत टोला देखील यावेळी रोहित पवार यांनी आमदार जगतापांसह पडळकर यांना लगावला आहे.
यवत येथील घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यांची कान टोचले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, महापुरुषांच्या पुतळ्यांना कोणी हात लावला नाही पाहिजे किंवा त्या स्मारकाची विटंबना होईल असा प्रयत्न केला कोणी तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. संबंधित गावातील गावकऱ्यांची भूमिका ही त्या व्यक्तीवर ती कारवाई झाली पाहिजे अशी आहे. याबाबत त्यांनी पोलिसांची चर्चा देखील केली.
200 कोटींचा फ्रंट-रनिंग घोटाळा! अॅक्सिस म्युच्युअल फंडचे माजी अधिकारी अटकेत, ईडीचे देशभरात छापे
संग्राम जगताप यांच्यासह पडळकरांना टोला
यवतमधील घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशीच काही सत्तेमधील नेते तिथे आले व त्यांनी सभा घेतली. या सभेनंतर तेथील वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. बाहेरून आलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य महामानवाच्या पुतळ्याची केली ही गोष्ट चुकीची आहे. मात्र या घटनेनंतर गावातील सर्वधर्मीय समाजाची लोक जातीय सलोखा कायम ठेवलं पाहिजे अशी भावना गावकऱ्यांची आहे. मात्र बाहेरून येऊन काही लोक वातावरण हे हिंदू मुस्लिम होईल असं किंवा दंगल करण्याचा प्रयत्न करतात मात्र यामध्ये दुकान ही गरीबाची जळतात घरही गरीबाची जळतात मात्र राजकीय दृष्ट्या पोळी हे राजकारणीच भाजत असतात. असा सणसणी टोला देखील यावेळी रोहित पवार यांनी लगावला.
‘ वाल्मिक कराडची राखच बाहेर येईल!’ बाळा बांगर यांचे खळबळजनक विधान
पैसा कोणत्या मंत्र्याच्या घरचा नसतो
मंत्री संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला. पवार म्हणाले, शिरसाट हे मंत्री आहेत. पैसा हा कोणाच्या घरचा नसतो. कोणाच्या घरून पैसा येत नसतो. त्यांचं वक्तव्य आपण पाहिलं तर त्यांचा असं मत असावं की, तिजोरीमधील पैसा जसं ते वापरतील तसा तो असतो. जनतेचा तो पैसा असतो. जबाबदाऱ्याने वक्तव्य करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि अजून तिजोरीत असताना पैसा जो असतो तो गरीबाचा असतो. कोणाच्या घरच्यांचा नसतो आणि बॅग भरण्यासाठी तर मुळीच नसतो. असे अशा शब्दांत रोहित पवारांनी मंत्री संजय शिरसाट यांना टोला लगावला.