200 कोटींचा फ्रंट-रनिंग घोटाळा! अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडचे माजी अधिकारी अटकेत, ईडीचे देशभरात छापे

200 कोटींचा फ्रंट-रनिंग घोटाळा! अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडचे माजी अधिकारी अटकेत, ईडीचे देशभरात छापे

Crime News : अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडमध्ये 2018 ते 2021 दरम्यान झालेल्या फ्रंट-रनिंग घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई (Axis Mutual Fund) करण्यात आली आहे. माजी वरिष्ठ निधी व्यवस्थापक आणि मुख्य व्यापारी वीरेश जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. हा घोटाळा जवळपास 200 कोटी रुपयांपर्यंतचा असून, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि बाजारातील पारदर्शकतेला तडा देणारा प्रकार (Crime News) असल्याचं ईडीने (ED) स्पष्ट केलं आहे.

अटक आणि ईडी कोठडी

वीरेश जोशी यांना 3 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आलं, आणि त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी त्यांना पीएमएलए (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा) अंतर्गत विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

फ्रंट-रनिंग म्हणजे काय?

फ्रंट-रनिंग ही एक बेकायदेशीर आणि अनैतिक आर्थिक फसवणूक आहे. यामध्ये ब्रोकर्स किंवा व्यापारी क्लायंटच्या आधीच स्वतःचे व्यवहार करून अंतर्गत माहितीचा गैरवापर करतात. यामुळे त्यांना अवैध नफा मिळतो, तर सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होते. ईडीच्या माहितीनुसार, जोशी यांनी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडच्या अंतर्गत व्यवहारांची गोपनीय माहिती वापरून स्वतःला आणि इतर व्यापाऱ्यांना अवैध लाभ मिळवून दिला.

‘ वाल्मिक कराडची राखच बाहेर येईल!’ बाळा बांगर यांचे खळबळजनक विधान

देशभरात ईडीचा छापा  

ईडीने 1 ऑगस्टपासून दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, लुधियाना, अहमदाबाद, भावनगर, भुज आणि कोलकाता येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवायांमध्ये 17.4 कोटी रुपयांचे शेअर्स, म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक बॅलन्स गोठवण्यात आले. ब्रोकर्स, म्यूल अकाउंट्स आणि शेल कंपन्यांचं गुंतागुंतीचं नेटवर्क उघडकीस आलं. ईडीचा दावा आहे की, जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुबईसह अनेक परदेशी शेल कंपन्या, ट्रेडिंग टर्मिनल्स आणि कुटुंबाच्या नावावर बँक खाती तयार केली होती. याच माध्यमातून त्यांनी 200 कोटींपेक्षा अधिक बेकायदेशीर नफा मिळवला. ईडीने म्हटलं आहे की, आरोपींनी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडच्या मोठ्या व्यवहारांपूर्वीच दलालांमार्फत म्यूल खात्यांतून व्यवहार करून नफा मिळवला.

पुरामुळे कहर! उत्तर प्रदेशात 12 जणांचा मृत्यू, बिहारमधील अनेक गावांशी संपर्क तुटला, हिमाचलमध्ये 300 रस्ते बंद

एफआयआर आणि आयकर विभागाची चौकशी

हा घोटाळा 2022 मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. त्याआधीही आयकर विभागाने 2022 मध्ये जोशी यांच्याविरुद्ध छापे टाकले होते. ईडीने ‘फेमा’ अंतर्गत तपास सुरू केला होता. घोटाळ्याच्या वेळी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडची मालमत्ता (AUM)2 लाख कोटी रुपयांहून अधिक होती.2022 मध्ये अनियमित ट्रेडिंग पॅटर्न आढळल्यावर जोशी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube