महायुतीसाठी प्रामाणिक प्रयत्न पण शेवटच्या क्षणी…, आमदार संग्राम जगतापांनी केला मोठा खुलासा
Sangram Jagtap Interview : राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना
Sangram Jagtap Interview : राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती करुन 34 जागांवर उमेदवार दिले आहे तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने महापौर कुणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष कार्यक्रमात बोलताना अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप महापौर कुणाचा होणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? यावर देखील स्पष्टीकरण दिले आहे.
या मुलाखतीमध्ये बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, तिन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा सुरु असताना अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती जवळपास झाली होती. याबाबत चर्चा देखील अंतिम टप्प्यात आली होती मात्र शेवटी एक – दोन जागेवरुन महायुती झाली नाही असं आमदार संग्राम जगताप म्हणाले. तर महापौर कुणाचा होणार हे महत्त्वाचा नसून आमचा प्रयत्न आहे की महापौर युतीचा झाला पाहिजे. आज ज्या विचाराचं सरकार राज्यात आहेत. त्याच विचाराचं सरकार केंद्रात देखील आहे. त्यामुळे त्याच विचाराचं सरकार शहरात देखील असेल तर याचा फायदा थेट शेवटच्या माणसाला होतो असं या मुलाखतीमध्ये बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले.
Lagnacha Shot : अभि – क्रितिकाचे केळवण झाले दणक्यात ‘लग्नाचा शॉट’चा टिझर प्रदर्शित
तर या मुलाखतीमध्ये अहिल्यानगर शहरातील मुस्लिमबहुल मुकुंदनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार का? दिला नाही यावर देखील आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावर बोलताना आमदार जगताप म्हणाले की, देशात लोकशाही असून कोणाला कुठे मत द्यायचे हे त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. आपण म्हणून शकत नाही की, कोणाला मत देऊ नको. मुकुंदनगरमधून (Mukundanagar) माझ्याकडे असा एकही व्यक्ती आला नाही की, तो म्हणेल की, मी भारताच्या संविधानाला मानतो, तिरंग्याला मानतो, मी औरंगाजेबाला नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो असं बोलणारा एकही व्यक्ती माझ्याकडे आला नाही त्यामुळे आम्ही त्या भागात उमेदवार दिले नाही असं आमदार जगताप म्हणाले.
