निलेश लंके लोकसभेची ‘तुतारी’ फुंकणार का? तनपुरेंचं सूचक विधान

निलेश लंके लोकसभेची ‘तुतारी’ फुंकणार का? तनपुरेंचं सूचक विधान

Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात नगर दक्षिण लोकसभा (Nagar Dakshin Lok Sabha)ही यंदा चांगलीच रंगणार असं चित्र दिसू लागलं आहे. अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील अशी आम्हाला आशा आहे, असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. लंके तुतारी फुंकणार का? पक्षात पुन्हा येणार का? असं विचारलं असता ते का येणार नाही? असं सूचक विधान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Government Schemes : सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेतला?

यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही. आपण विधानसभा लढवणार असल्याचं तनपुरे यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्याला मोठा जनप्रतिसाद मिळाला. तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळं काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.

Bhumi Pedanekar : भक्षकच्या यशाचं क्रेडिट देत माध्यामांना, भूमीचं पत्रकारांना ट्रिब्यूट!

लंकेंचा पक्षप्रवेश होणार काय? यावर ते म्हणाले की लंके का येणार नाही? असे म्हणत एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं. महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल, याबद्दल कुठलीही शंका नाही, असं देखील यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

कोल्हेंचे लंकेंना आमंत्रण
खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले एक महानाट्य नगर शहरात पार पडले. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी कोल्हे यांनी मंचावरुनच आमदार लंके यांना नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी वाजवा अशी मागणी केली. तसेच लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं देखील कोल्हे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज