लाडक्या बाप्पाला निरोप : ग्रामदैवत, मानाच्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Shri Vishal Ganesh Mandal

The immersion procession of Shri Vishal Ganesh Mandal : नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणूकीत पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल- ताशे, लेझीम पथकाने मिरवणुकीला अधिक आकर्षक बनविले.

धक्कादायक! लालबागच्या राजाच्या गेटजवळ भीषण अपघात, दोन चिमुकल्यांना चिरडले; एकाचा मृत्यू

विसर्जनाचा मार्ग

श्री विशाल गणपती मंदिरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातूनच ठरवण्यात आला आहे. माळीवाडा मार्गे मध्य शहरातील विविध भागातून श्री गणेशाची (Vishal Ganpati) मिरवणूक निघणार आहे. नगरच्या मध्यवर्ती भागातून मिरवणूक निघाल्यानंतर दिल्ली गेट मार्गाने सायंकाळी श्री गणेशाचे (Vishal Ganpati) विसर्जन होणार आहे.

आधी टॅरिफ कार्ड आता मैत्रीचा डाव! “मोदी अन् मी नेहमीच मित्र”, ट्रम्प यांच्या मेसेजला मोदींचा खास रिप्लाय..

शिस्तबद्ध व नियोजनबद्ध मंडळ

सकाळी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात (Vishal Ganpati) महाआरती करण्यात आली. यावेळी श्री विशाल गणेश ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. . महाआरतीनंतर जागोजागी श्री विशाल गणेश मंडळाच्या (Shri Vishal Ganesh Mandal) गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. आरती नंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. श्री विशाल गणेश मंडळाची (Shri Vishal Ganesh Mandal) शिस्तबद्ध व नियोजनबद्ध मंडळ म्हणून ख्याती आहे. तसेच हे मंडळ (Vishal Ganpati) नेहमी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देत आले आहे.

भारताची गुगली! PM मोदींनी अमेरिका दौरा टाळला; UN परिषदेत जयशंकर यांच्या हाती कमान

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मोठ्या भक्तीभावाने गणरायाला (Vishal Ganpati) निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube