अण्णा हजारेंच्या प्रकृतीबाबत विखे पाटलांना चिंता; रुग्णालयात जाऊन घेतली भेट
Vikhe Patil Meets Anna Hazare at Hospital अण्णा हजारे रुग्णालयात दाखल; विखे पाटलांनी घेतली भेट आणि डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली.
यावेळी विखे पाटील यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली. अण्णांना योग्य उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाशीही चर्चा केली.
अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच विखे पाटील यांनी तातडीने मुंबई गाठून त्यांची भेट घेतली. यापूर्वीही त्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
मोठा राडा; ओबीसी आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, पाटस टोलनाक्यावर वातावरण पेटलं!
दरम्यान, प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने अण्णा हजारे यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले. त्यानंतर विखे पाटील यांनी रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांकडून त्यांच्या उपचारांची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.