Ahilyanagar : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, ग्रामस्थांचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर – भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी (Kanifnath Mandir Madhi) येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या (Kanifnath Maharaj yatra) यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. मात्र, या ऐक्यालाच तडा जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
भारतातील नऊ शहरे सर्वात स्वस्त, महागड्या शहरांत पहिलं कोण?, वाचा अहवाल
श्री कानिफनाथ महाराजांनी दहाव्या शतकात पाथर्डी तालुक्यातील मढी येथे गडावर संजीवन समाधी घेतली. यानिमित्त दरवर्षी मढी येथे होळी ते गुढीपाडवा या कालावधीत यात्रौत्सव साजरा केला जातो. या यात्रेला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, कोकण आदी प्रांतांमधून मोठ्या संख्येने भाविक येतात. यामुळे राज्यात या यात्रेला एक वेगळे महत्व देखील प्राप्त होत असते. मात्र यंदाच्या यात्रेपूर्वी तेथील ग्रामस्थांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सध्या मढी चांगलेच चर्चेत आहे.
Ahilyanagar : ठाकरे गटाचा कॉंग्रेसला धक्का, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी हाती घेतली मशाल
मढी येथील यात्रेचा प्रारंभ होळीपासून होतो. रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी नाथसमाधी दिन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक श्रीकानिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. दरम्यान यात्रेचा काळ हा दुखवट्याचा काळ असतो, मात्र मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत आणि त्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते, असं ग्रामस्थांनी सांगितलं.
यात्रेच्या या काळात ग्रामस्थ तळणे, लग्नकार्य, शेतीकामे, प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग, गादीही वापरत नाहीत. महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात. मात्र मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत असं ग्रामस्थांचं मत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनेला ठेच पोहचत असल्याचं सांगत ग्रामस्थांनी हा ठराव ठरविला आहे. या प्रकरणी सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड यांनी माहिती दिली.
मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, नेमकं कारण काय?
सरपंच संजय बाजीराव मरकड म्हणाले की, जे लोक स्वतः कुंकू लावत नाहीत ते लोक आम्हाला कुंकू विकतात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांकडून भाविकांची लूट होते. या आधी भाविकांना मारहाणही करण्यात आली होती. अशा भाविकांनी, ग्रामस्थांनी आमच्याकडे पत्रं लिहित मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार मुस्लीम व्यावसायिकांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच मरकड यांनी सांगितले.