मढी यात्रा, राणेंचं प्रक्षोभक भाषण, मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्ताक्षेप करावे नाहीतर…, प्रताप ढाकणे आक्रमक

Pratap Dhakne : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रा (Madhi Yatra) चर्चेत आहे. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन मढी यात्रा उत्सवामध्ये मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केला होता. त्यानंतर हा ठराव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी रद्द केला आहे. या ठिकाणी राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जाहीर सभा घेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठरावाला समर्थन दिले आहे.
तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांनी मंत्री नितेश राणे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे प्रक्षोभक भाषण केलं असल्याचा आरोप केला आहे. तसेच कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून समन्वय साधून कुठलातरी तोडगा काढण्याचं गरजेचे आहे. किंवा यावर्षीची यात्रा उत्सव प्रशासकाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केली आहे.
लेटस्अप मराठीशी बोलताना, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रताप ढाकणे म्हणाले की, श्री क्षेत्र मढी जत्रेचा वाद संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. कालच राज्याचे एक मंत्री महोदय आले होते त्यांनी चुकाच्या माहितीच्या आधारे प्रक्षोभक भाषण केलं आहे. त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून समन्वय साधून कुठलातरी तोडगा काढण्याचं गरजेचे आहे. असं राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रताप ढाकणे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?
मढी येते आयोजित सभेमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्यात आल्याचा ठराव करण्याच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आमचं सरकार हिंदुत्ववादी आहे. प्रशासनाने त्या गटविकास अधिकाऱ्याला कळवा की, हा ठराव रद्द होणार नाही. आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. तुमच्याविषयी बोललो तर लगेच मारण्याच्या धमक्या देतात.
तसेच ते यात्रेत मटनाच्या दुकाना लावतात ते आम्हाला मान्य नाही. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. ही सरपंचाची भूमिका त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. हिंदू समजामुळे आम्ही आमदार झालो आहोत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहणार असणार जास्त दिवस खुर्चीवर राहणार नाही. देवाभाऊंचे सरकार आहे कोण अधिकारी वाकड्यात जातो ते आम्ही पाहतो. ठराव रद्द केला तर ठराव तुम्हाला परत मिळणार असा शब्द मी तुम्हाला देऊन जातो असं नितेश राणे म्हणाले होते.
मोठी बातमी! विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर
प्रकरण काय?
मढी गावात 22 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र मढी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन मढी यात्रा उत्सवामध्ये मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केला होता. मात्र हा ठराव नियमबाह्य असल्याने मढी यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी करण्यासह सभेतील सर्वच ठराव आपोआपच रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिली होती.