कोण अधिकारी वाकड्यात जातो, पाहतो? बंदीचा ठराव परत मिळणार; नितेश राणेंचा मढीमध्ये शब्द

Nitesh Rane on Madhi Gram Sabha decision : भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मढी (Madhi Gram Sabha) येथील यात्रा सध्या चर्चेत आहे. कारण या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्यात आल्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. यावरून मोठा गदारोळ झाला आहे. त्यात आज मंत्री नितेश राणे यांनी सभा घेत ग्रामस्थांच्या ठरावाला पाठींबा दिला आहे.
बीड महामार्गावर अंबडजवळ अपघात; सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार
यावेळी बोलताना ते म्हणाले की, यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्यात आल्याचा ठराव करण्याच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आमचं सरकार हिंदुत्ववादी आहे. प्रशासनाने त्या गटविकास अधिकाऱ्याला कळवा की, हा ठराव रद्द होणार नाही. आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. तुमच्याविषयी बोललो तर लगेच मारण्याच्या धमक्या देतात.
तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या मंत्र्याचा अधिवेशनात सहभाग नको; वडेट्टीवारांची टीका करत मागणी
तसेच ते यात्रेत मटनाच्या दुकाना लावतात ते आम्हाला मान्य नाही. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. ही सरपंचाची भूमिका त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. हिंदू समजामुळे आम्ही आमदार झालो आहोत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहणार असणार जास्त दिवस खुर्चीवर राहणार नाही. देवाभाऊंचे सरकार आहे कोण अधिकारी वाकड्यात जातो ते आम्ही पाहतो. ठराव रद्द केला तर ठराव तुम्हाला परत मिळणार असा शब्द मी तुम्हाला देऊन जातो असं नितेश राणे म्हणाले आहेत.
नियमात जे बसते तेच करा राणेंनी सरपंचांना केल आवाहन. हा ठराव करून घ्यायचा त्यांची मस्ती आपल्या सरकार मध्ये चालणार नाही. सरकार त्यांची अतिक्रमण काढायचे पाऊल आपण उचलले. ठराव मान्य करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. २०४७ ला इस्लाम राष्ट्र बनवायचे हे वक्फ चे मनसुंबे आहेत. ज्यांना स्वतःच्या बापाचे नाव माहीत नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्र शिकविणार. मी एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद द्यायला आलो आहे. आमदार मंत्री म्हणून नाही. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने असा ठराव घ्यावा. आता माझी राजकीय दृष्ट्या उंची वाढलीय त्यामुळे जास्त बोलत नाही. मला अधिवेशनासाठी देखील जायचं आहे.