बीड महामार्गावर अंबडजवळ अपघात; सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार

बीड महामार्गावर अंबडजवळ अपघात; सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार

Ambad Accident : बीड महामार्गावरील अंबड शहरापासून अवघ्या तीन किलो मिटर (Accident) अंतरावर यशवंत सहकारी सूतगिरणीलगत सळई घेऊन जाणारा ट्रक उलटा झाल्याने ट्रॅकचा चालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना भरदिवसा घडली आहे.

अंबड तालुक्यातील शहागड येथील अन्सार जब्बार बागवान (वय-30) वर्षे हा जालना येथून एम.एच.12 ए.आर.2322 हि सळईचा ट्रक घेऊन चालक बिडकडे जात असताना शहराजवळील यशवंत सहकारी सूतगिरणीलगत शनिवारी (ता. 1) दुपारी साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान जात असताना यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक जाग्यावर उलटा होऊन यामधील ट्रक चालक अन्सार बागवान जाग्यावर ठार झाल्याची घटना घडली.

..नाहीतर वाल्मीक अण्णा तुला सोडणार नाही; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी कराड अन् घुले काय बोलले?

डावरगाव, रामनगर व सूतगिरणी परिसरात हि घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान नरवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील भिसे, फलटणकर, हरकाळ, डोईफोडे हे घटनास्थळी दाखल झाले होते.

नागरीकांच्या मदतीने ट्रक चालकाची बॉडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केली होती. डॉक्टरांनी शविच्छेदन केले. अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत या घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube