..नाहीतर वाल्मीक अण्णा तुला सोडणार नाही; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी कराड अन् घुले काय बोलले?

..नाहीतर वाल्मीक अण्णा तुला सोडणार नाही; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी कराड अन् घुले काय बोलले?

Walmik karad CID Charge Sheet : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच खंडणीच्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मीक कराडवर संशय होता. आता कराड देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं समोर आलं आहे. (CID) खंडणीच्या प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, असंही सीआयडीच्या तपासातून समोर आलं आहे.

वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेवर वार

आवादा कंपनीकडं वाल्मीक कराडने दोन कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर पूर्ण बीड जिल्ह्यात काम करू देणार नाही, अशी धमकीही दिली होती. या प्रकरणात काम थांबवल्यानंतर संतोष देशमुख यांनी खंडणी मागू नका. आवादा कंपनीच्या लोकांना काम करू द्या. माझ्या गावातील लोकांना मिळेल. पण, संतोष देशमुखांचं म्हणणं आरोपींनी काही ऐकले नाही. त्यानंतर संतोष देशमुख यांनाच त्यांनी टार्गेट केलं.

आरोपपत्रात काय?

सीआयडीने जे आरोपपत्र केज न्यायालयात दाखल केले आहे, त्यात म्हटले आहे की, “विष्ण चाटे हा वारंवार संतोष देशमुख यांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको. वाल्मीक अण्णा कराड तुला जिवंत सोडणार नाही, अशी देत होता. याबाबत संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले.”

कंपनी खंडणी देणार नाही

‘७ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडला कॉल केला. त्यावेळी वाल्मीक कराडने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे संतोष देशमुख आडवा येत असेल, तर त्याला कायमचा धडा शिकवा.”

नंतर केली संतोष देशमुखांची हत्या

वाल्मीक कराडसोबत बोलणं झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता अपहरण करण्यात आले. याबद्दल आरोपपत्रात म्हटलं आहे की, आरोपींनी संतोष देशमुख यांचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपींनी पांढऱ्या रंगाचे पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, काठी यांचा वापर मारहाण करण्यासाठी करण्यात आला. चिंचोली टाकळीकडे नेले. तिथे अमानुष मारहाण केली. त्यांचा खून करून साडेसहाच्या सुमारास त्यांचे प्रेत दैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube