बारामतीत काळाचं तांडव! अपघातात मुलगा आणि 2 नातींचा मृत्यू, धक्क्याने आजोबांनीही सोडला श्वास

बारामतीत काळाचं तांडव! अपघातात मुलगा आणि 2 नातींचा मृत्यू, धक्क्याने आजोबांनीही सोडला श्वास

Baramati Accident Four Members Of Family Died : बारामतीमधील खंडोबानगर परिसरात (Baramati Accident) रविवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वडिलांसह दोन निष्पाप चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर त्या दु:खद घटनेचा मानसिक आघात इतका खोल होता की, केवळ 24 तासांत मुलगा आणि नात्या गमावलेल्या वृद्ध (Baramati News) आजोबांनीही जगाचा निरोप घेतला.

हृदयविदारक घटना

रविवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास, ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलींसह दुचाकीवरून प्रवास करत होते. ते खंडोबानगर चौकातून जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका मालवाहू डंपरने त्यांच्या दुचाकीला (Accident News) जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. घटनास्थळीच ओंकार आचार्य यांचा मृत्यू झाला, तर त्यांची ११ वर्षांची कन्या सई आणि 5 वर्षांची मधुरा या दोघी गंभीर जखमी झाल्या. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषित केले.

आता सरकारला संधी नाही, सरळ मुंबईला निघायचं; मराठ्यांच्या नादाला लागू नका म्हणत जरांगेंचा आंदोलनाचा इशारा

24 तासांत चार अंत्ययात्रा

या अपघाताचे वृत्त ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांना कळताच ते पूर्णपणे कोलमडून गेले. निवृत्त शिक्षक असलेल्या या वृद्ध पित्याने एका दिवसात आपला ‘सोन्यासारखा मुलगा’ आणि दोन गोंडस नात्या गमावल्या. मानसिक धक्का (Acharya Family) एवढा खोल होता की, रात्रभर रडत बसलेल्या श्रीनिवास आचार्य यांचंही सोमवारी पहाटे निधन झालं.आचार्य कुटुंबातील चार जणांचे एकामागोमाग एक असे निधन झाल्याने बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. वडील, दोन चिमुरड्या मुली आणि वृद्ध आजोबा, चारही जणांनी अवघ्या 24 तासांत या जगाचा निरोप घेतला आहे.

प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर! पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया

वाहतूक सुरक्षेचा मुद्दा

या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अपघात का आणि कसा घडला, याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास अधिक खोलात नेण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. ओंकार आचार्य यांचं कुटुंब बारामतीत अत्यंत साधं, कष्टकरी आणि शांत जीवन जगणाऱ्या कुटुंबांपैकी होतं. त्यांच्या अचानक जाण्यानं आणि त्या मागोमाग वृद्ध पित्याच्या निधनानं सगळ्या समाजमनाला हादरवून टाकलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube