Plane Accident : बारामतीत प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

  • Written By: Published:
Plane Accident : बारामतीत प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

Baramati plane crash news: तीन-चार दिवसांपूर्वी बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पालयट किरकोळ जखमी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात (plane crash ) झाला आहे. या अपघात पायलटला दुखापत झाली आहे. सतत विमान अपघात होत असल्यां विमानतळानजिक असलेलया नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसी विमानतळावर रेड बर्ड फ्लाय कंपनीच्य मार्फत विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. मात्र, रेड बर्ड कंपनीचे विमान रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त झाले. जुना काऊ फार्ननजिक लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस या विमानाचा अपघात झाला आहे. VT RVT Tecnam या जातीचे हे दोन आसनी विमान होते. प्रशिक्षणादरम्यान, हे विमान अचानक शेतात कोसळले. या अपघातात पायलट जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बारामती येथील प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही दिवसांतील हा पाचवा अपघात आहे. काही महिन्यांपूर्वी मेखळी येथील नीरा नदीच्या पुलाखालून विमान घालण्याच्या नादात अपघात झाला होता. दोनच दिवसांपूर्वी रेड बर्ड कंपनीचे विमान विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले होते.

MPSC मार्फत 378 पदांसाठी बंपर भरती, 9 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज 

तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं बोलल्या जातं आहे. मात्र, या विमान अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. हा अपघात नेमका कशामुळं झाला, प्रशिक्षणार्थी पायलटकडून काही चुक झाली का? याची चौकशी लवकरच होईल. हे अपघातग्रस्त विमान आकाराने छोटं होतं. पण, अपघातामुळं विमानाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube