..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; प्रताप ढाकणेंचे आमदार राजळेंना चॅलेंज!
Ahmednagar Politics : विकासकामांच्या नावाखाली शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सत्ताधारी आमदार मोनिका राजळेंनी (Monika Rajale) मोठा भ्रष्टाचार केला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतल्याने रस्त्यांची निकृष्ट कामे झाली. आमदार मोनिका राजळे या कर्तबगार आमदार नसून टक्केवारी आमदार आहेत, असा हल्लाबोल प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) यांनी केला. तसेच आपण केलेले आरोप सिद्ध करायला तयार आहोत असे थेट चॅलेंजही ढाकणे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा काल पाथर्डी शहरात पार पडला. यावेळी प्रताप ढाकणे यांनी पाथर्डी मतदारसंघातील समस्या तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आमदार मोनिका राजळे यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले, की गेली दहा वर्षे दोन्ही तालुक्यांचे वाटोळे झाले आहे. कोणतीही विकासकामे या तालुक्यांमध्ये झाली नाहीत. याला जबाबदार केवळ लोकप्रतिनिधी आहेत.
Chandrasekhar Ghule जिल्हा बॅंकेतील पराभवाचा बदला घेणार; मोनिका राजळेंच्या पराभवाचा निर्धार
शेवगाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. पाथर्डी तालुक्यातही दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. जनतेच्या समस्यांकडे राजळे यांचे लक्ष नाही. रस्त्यांची निकृष्ट कामे तालुक्यात झाली आहेत. मंजूर कामांच्या अंदाजपत्रकाचा फलक लावावा लागतो हा शासनाचा आदेश आहे मात्र, यांनी ते न करता केवळ भूमिपूजनाचे बोर्ड लावले कारण यांचे पितळ उघडे पडू नये अशी टीका ढाकणे यांनी केली.
..तर मी राजकारणातून संन्यास घेईन
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. विकासकामे झाल्याचे सांगत मोठी बॅनरबाजी केली जाते मात्र प्रत्यक्षात विकासकामे झालीच नाहीत, असा आरोप प्रताप ढाकणे यांनी केला. मी कोणतीही तथ्यहीन आरोप करत नाही याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आमदार राजळे यांनी समोरासमोर येऊन याबाबत बोलावं जर हे आरोप खोटे ठरले ते मी राजकारणातून संन्यास घेईन. जर आरोप खरे ठरले तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा असे असं म्हणत थेट मंचावरूनच ढाकणे यांनी सत्ताधारी आमदार मोनिका राजळे यांना चॅलेंज केलं.
नगरसाठी शरद पवारांचं काय ठरतंय? ढाकणे, तनपुरे की आणखी कोण? लवकरच फैसला
टक्केवारीशिवाय कामच नाही
आज मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांवरून ठेकेदार व समर्थकांमध्ये वाद होत आहे. टक्केवारी मिळाली नाही तर कामे होत नाहीत. कुठे व त्यांचा निधी आला मात्र त्यात दर्जाची कामे झाली का असा प्रश्न देखील राजळे यांना विचारला गेला पाहिजे. हे लोकप्रतिनिधी सध्या मस्तीत आहे. जनतेच्या पैशाची लूट तुम्ही चालवली आहे मात्र निवडणुकीत मतदार तुम्हाला उत्तर देणार असं देखील यावेळी बोलताना ढाकणे यांनी म्हटले.