‘लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर त्यांची चौकशी व्हावी’, मढी देवस्थान मारहाण प्रकरणी ढाकणेंची मागणी

  • Written By: Published:
‘लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर त्यांची चौकशी व्हावी’, मढी देवस्थान मारहाण प्रकरणी ढाकणेंची मागणी

अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या (Kanifnath Devasthan Trust) विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झालेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) हे नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे (Pratap dhakane) यांनी मरकड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मरकड यांनी सत्ताधारी आमदार मोनिका राजळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर याबाबत चौकशी होणे गरजेची आहे, असे मत यावेळी ढाकणेंनी व्यक्त केले आहे. दरम्यान या वादामुळे आता राजकीय वातावरण तापू लागले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा ग्लॅमर तडका, पाहा फोटो 

अनेक दिवसांपासून कानिफनाथ देवस्थानच्या ट्रस्टमधील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवरून धुसफूस सुरू होती. काल सकाळी मंदिर समितीच्या सभागृहात अध्यक्ष निवडीसंदर्भात सर्व विश्वस्तांची बैठक बोलावण्यात आली होती.यावेळी विश्वस्त मंडळातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अध्यक्ष पदावरून झालेल्या या हाणामारीत सात जण जखमी झाले आहेत. या मारहाणीत देवस्थानाचे अध्यक्ष संजय मरकड हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केला आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी आज रुग्णालयात जाऊन मरकड यांची भेट घेतली.

पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई, आठ बांग्लादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या 

यावेळी प्रसादर माध्यमांशी बोलताना ढाकणे म्हणाले, लोकप्रतिनिधी कोणताही असो त्यांच्याविषयी कोणी तक्रार करत असेल तर यामध्ये काही तथ्य आहे कि नाही याची शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे. राज्यकर्ता हा निष्कलंक असला पाहिजे, अशी आपली संस्कृती सांगते. लोकप्रतिनिधीबाबत पारदर्शकता असली पाहिजे. मात्र जर एखादा नागरिक याच लोकप्रतिनिधीबाबत आवाज उठवत असले किंवा तक्रार करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असं ढाकणे म्हणाले.

खुद्द लोकप्रतिनिधी यांनी स्वतःयाबाबत पुढे आले पाहिजे. आपल्यावर आरोप होत आहे, या आरोपबाबत सविस्तर चौकशी ही झाली पाहिजे अशी मागणी त्याच संबंधित लोकप्रतिनिधीने करणे गरजेची आहे. लोकप्रतिनिधीवर आरोप असताना त्यांच्याकडे शंकेने पाहिले जाते. म्हणून अशी कोणतीही शंका कोणाच्या मनात राहू नये यासाठी स्वतः लोकप्रतिनिधींनी पुढे येत आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेची आहे, असे देखील यावेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले.

संजय मरकड यांचे आरोप काय?
कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव निवडीवरून काल वाद निर्माण झाला होता. अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेल्या सभेत जोरदार हाणामारी झाली. अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त विश्वजित डोकेंसह अनेक जण जखमी झाले. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. मोनिका राजळे यांच्या घरी मला मारण्याचा कट रचल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube