भारताची गुगली! PM मोदींनी अमेरिका दौरा टाळला; UN परिषदेत जयशंकर यांच्या हाती कमान

UNGA Session PM Narendra Modi : टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धक्के देणारे निर्णय घेतले जात आहेत. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एससीओ समिटमध्ये चीन, भारत आणि रशिया या तीन देशांची चांगली केमिस्ट्री दिसली. अमेरिकेच्या दादागिरीसाठी हा मेसेज होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे भारताने मात्र अमेरिकेकडून कच्चे तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यातून सावरण्याचा वेळ मिळायच्या आत भारताने आणखी एक धक्का दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात पीएम मोदी सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी होतील. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 9 सप्टेंबरपासून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात या परिषदेच्या संदर्भात (United Nations) एक यादी जाहीर झाली होती. या यादीत भाषण देणाऱ्या वक्त्यांत मोदींचं नाव (PM Narendra Modi) होतं. पीएम मोदी 27 सप्टेंबरला बैठकीत संबोधन करणार होते. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांकडून (UNGA Session) नवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर महासभेला संबोधित करतील असे नमूद करण्यात आले आहे. भारताने UNGA ला या बदलांची माहिती आधीच दिली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ! टॅरिफचा जाच संपला; ट्रम्पची माघार, जपानवर फक्त 15% कर
अमेरिकेसह अनेक देशांचा सहभाग
संयुक्त राष्ट्र महासभेचे 80 वे सत्र 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यात 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान चर्चासत्र होणार आहेत. या चर्चासत्राची सुरुवात ब्राझीलपासून होणार आहे. यानंतर अमेरिकेचा नंबर आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 23 सप्टेंबर रोजी भाषण देतील. काल यादी जाहीर करण्यात आली. यात भारताचे प्रतिनिधीत्व एस. जयशंकर करतील असे म्हटले आहे. याआधी जुलैमध्ये जी यादी जाहीर करण्यात आली होती त्यात पीएम मोदी 26 सप्टेंबर रोजी चर्चासत्रात संबोधन देतील असे म्हटले होते. आता मात्र यात बदल झाला आहे. इस्त्रायल, पाकिस्तान, चीन आणि बांग्लादेशचे प्रमुख 26 सप्टेंबर रोजी महासभेत भाषण देतील.
मोदींचा फेब्रुवारीत अमेरिका दौरा
याआधी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यानंतर मात्र दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला. यातील 25 टक्के टॅरिफ भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून लावला आहे. यानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. भारतानेही अमेरिकेला धक्का देणारे काही निर्णय घेतले आहेत. पीएम मोदींचा अमेरिका दौरा रद्द होणे हा त्याचाच भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र महासभेच्या यादीत असे बदल याआधीही झाले आहेत असे सांगण्यात येत आहे.
US Tariff : भारताच्या आयटी कंपन्यांवर ट्रम्पचं सावट; विप्रो, टीसीएससह 4 बड्या कंपन्यांना मोठा धोका