आधी टॅरिफ कार्ड आता मैत्रीचा डाव! “मोदी अन् मी नेहमीच मित्र”, ट्रम्प यांच्या मेसेजला मोदींचा खास रिप्लाय..

Donald Trump

PM Modi replies Donald Trump : टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धक्के देणारे निर्णय घेतले जात आहेत. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एससीओ समिटमध्ये चीन, भारत आणि रशिया या तीन देशांची चांगली केमिस्ट्री दिसली. अमेरिकेच्या दादागिरीसाठी हा मेसेज होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ट्रम्प यांच्या वक्तव्याची चर्चा जागतिक राजकारणात होत असतानाच पीएम मोदींचंही उत्तर आलं आहे. दोन्ही नेत्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊ या..

पीएम मोदी अन् मी मित्र, डोन्ट वरी.. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) ओवल ऑफीसमध्ये बोलताना भारत आणि अमेरिका (India US Relations) यांच्यातील संबंधांवर जोर दिला. दोन्ही देशांतील संबंध खूप विशेष आहेत आणि सध्याच्या तणावाच्या परिस्थितीतही मी आणि मोदी (PM Modi) मित्र आहोत. मोदी एक चांगले पंतप्रधान आहेत. ते खरंच ग्रेट आहेत. पण सध्या त्यांच्याकडून जे काही केलं जात आहे ते मला पसंत नाही. तरीही दोन्ही देशांतील संबंध विशेष आहेत. चिंता करू नका कारण दोन्ही देशांत कधी कधी असे प्रसंग येतात असे ट्रम्प यांनी सांगितले.

भारताची गुगली! PM मोदींनी अमेरिका दौरा टाळला; UN परिषदेत जयशंकर यांच्या हाती कमान

ट्रम्प म्हणाले, मी खूप निराश 

भारताशी संबंध सुधारण्यासाठी तुम्ही तयार आहात का असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी काही मुद्द्यांवर नाराजीही व्यक्त केली. भारत रशियाकडून अजूनही तेल खरेदी करतोय यामुळे मी खूप निराश आहे. आम्ही भारतावर भरपूर टॅरिफ लावला तरीही भारताची तेल खरेदी सुरुच आहे. पीएम मोदींशी माझे चांगले संबंध आहेत. ते महान आहेत. काही महिन्यांपूर्वी ते येथे आले होते असेही ट्रम्प यांनी सांगितले.

पीएम मोदींनीही दिला खास रिप्लाय 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी दोन्ही देशांतील संबंधांचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावना आणि दोन्ही देशांतील संबंधांच्या मूल्यांकनाचे कौतुक करतो. त्यांना पूर्ण पाठिंबा आहेच. भारत आणि अमेरिकेत एक सकारात्मक आणि जागतिक भागीदारी आहे, अशा शब्दांत मोदींनी उत्तर दिलं आहे.

US Tariff : भारताच्या आयटी कंपन्यांवर ट्रम्पचं सावट; विप्रो, टीसीएससह 4 बड्या कंपन्यांना मोठा धोका 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube