काँग्रेसला मोठा धक्का! आमदार राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता

काँग्रेसला मोठा धक्का! आमदार राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता

MLA Raju Parwe Join Shivsena : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

काँग्रेसला मोठा धक्का! आमदार राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृपाल तुमाने, आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटात छोटेखानी पक्ष प्रवेश केला. यावेळी राजू पारवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेन, असे त्यांनी सांगितलं.

वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ इम्रान हाश्मीच्या सिनेमॅटिक प्रवासाची गोष्ट! 

या देशाचे लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. आता मी महायुतीसोबत काम करणार आहे. शेवटी विकासाचे राजकारण महत्त्वाचे असते. आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे, यासाठी मी महायुतीसोबत आलो असल्याचं पक्ष प्रवेशावेळी बोलतांना सांगितल.

या पक्ष प्रवेशानंतर राजू पारवे यांना आता रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता बोलली जातेय. रामटेक येथील कृपाल तुमाने यांच्याबद्दलचा अहवाल चांगला नाही. त्यामुळं पर्यायी उमेदवार शोधा, असं भाजपने शिंदे गटाला कळवलं होतं. त्यानंतर आता पारवे यांनी शिंदं गटात प्रवेश केल्यानं शिवसेनेकडून त्यांनी उमदेवारी मिळू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube