अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघही ठरला

अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघही ठरला

Loksabha Election 2024 : राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुणे लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मनसे विद्यार्थ्यी सेनेने मोर्चा काढला होता. यावेळी अमित ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं. ते म्हणाले की राज साहेबांनी जबाबदारी दिली तर मी कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार आहे. पक्षाने सांगितले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक पण होईल, सरपंचही होईल. पुण्यातूनही लोकसभा लढवेल. पण माझी स्वत:हून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेले आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. मनसेच्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करणार आहेत. एका शहरात एवढे ड्रग्ज सापडले आहेत तर याला गृहमंत्री जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राज्यातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कविता व्दिवेदी पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त

ते पुढं म्हणाले की विद्यापीठाच्या स्थापनेपासून मेसमध्ये चांगले जेवण मिळत नाही. जेवणासाठी संघर्ष करावा लगतोय ही शोकांतिका आहे. काल पोह्यात झुरळ निघाले. यावेळी त्यांनी त्यांनी पोह्यातील झुरळाचा फोटो दाखवला. तसेच वॅाशरुम आणि होस्टेलचे फोटोही दाखवले.

विशाखा समितीचा मुद्दा मांडत ते पुढं म्हणाले की मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय. ती संधी पुणे विद्यापिठाने देऊ नये. मी त्यांना 8 दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही. तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईतील एक अन् उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांना वेगळा न्याय का? आमदार तांबेंचा EC ला सवाल

पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगर येथे उपकेंद्र आहे. तेथील नवीन इमारती तयार झाली आहे. पण मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणून उद्घाटन होत नाही, अशी टीका त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज