राज्यातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कविता व्दिवेदी पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त

राज्यातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कविता व्दिवेदी पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त

IAS Officer Transfers : राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officer Transfers) बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी (IAS Kavita Dwivedi) यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्तिकी एन एस (IAS Karthiki NS) यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक पदी करण्यात आली आहे.

बदल्या झालेले आयएएस अधिकारी
1. कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर

2. डॉ. हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.

3. कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर

4. कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर

मुंबईतील एक अन् उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांना वेगळा न्याय का? आमदार तांबेंचा EC ला सवाल

5. मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर

6. एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर

7. कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.

8. विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर

9. संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर

10. पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर

Chitra Wagh : तुतारीतुनी थकाल वाजवुनी, भाजपद्वेषाची जुनी पिपाणी; चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंना टोला

11. ओ पी गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर

12. राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना लवकरच अटक होणार; ‘आप’ नेत्याच्या दाव्याने खळबळ!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज