Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना लवकरच अटक होणार; ‘आप’ नेत्याच्या दाव्याने खळबळ!

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना लवकरच अटक होणार; ‘आप’ नेत्याच्या दाव्याने खळबळ!

Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना येत्या दोन ते तीन दिवसांत अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मंत्री भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. जर दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी झाली तर केजरीवाल यांना तुरुंगात टाकावे. जर त्यांना या समस्येतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करू नये असे भाजपचे काही लोक सांगत असल्याचा आरोपही भारद्वाज यांनी केला.

सध्या भाजप खूप घाबरलेला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेस एकत्र येतील असे त्यांना वाटत आहे. भाजपला आता सत्ता स्थापन करणे कठीण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत आप नेते संदीप पाठक, आतिशी मार्लेना या देखील उपस्थित होत्या. संदीप पाठक म्हणाले, की सर्व घोषणा एकाच वेळी केल्या जातील. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मला खात्री आहे की आघाडीची घोषणा लवकरच होईल.

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची धाड

याआधी आतिशी यांनीही केजरीवाल यांना अटक होऊ शकते असा दावा केला होता. याद्वारे आप नेत्यांना मेसेज दिला जात आहे की इंडिया आघाडीतून बाहेर पडा. आघाडी केल्यास त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली आहे. सीबीआयची नोटीस दोन दिवसांत येऊ शकते. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप मंत्री आतिशी यांनी केला. केजरीवालांना अटक करण्याच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. पक्षाच्या सर्व आमदार आणि नेत्यांना तुरुंगात टाकले तरी आपचा प्रत्येक कार्यकर्ता नेता म्हणून उभा राहिल आणि देशाच्या लोकशाही, संविधानाचे रक्षण करील असे आतिशी म्हणाल्या.

दरम्यान, ईडीने अरविंद केजरीवाल यांना सातव्यांदा समन्स बजावले आहे. सहाव्या समन्सवेळी त्यांना 19 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र केजरीवाल काही हजर राहिले नाहीत. हे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगितले होते त्यामुळे ईडीने काही काळ वाट पहावी असे केजरीवाल यांनी सांगितले होते.

FEMA प्रकरणी हिरानंदानी कंपनी ईडीच्या रडारवर; 5 ठिकाणी छापेमारी…

याआधी ईडीने केजरीवाल यांना सहा समन्स पाठवल आहेत. याकडे केजरीवालांनी दुर्लक्ष केले. ईडीने केजरीवाल यांना 19 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स बजावले होते. याआधी केजरीवाल यांनी ईडीला विचारले होते की जर मी दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात आरोपी नाही तर समन्स का बजावले जात आहेत.

काय आहेत आरोप ?

दिल्ली सरकारने 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ज्या मद्य विक्रेत्यांना परवाने दिले होते. त्यांनी त्यासाठी लाच दिली होती आणि परवानेही त्यांच्या पसंतीच्या विक्रेत्यांनाच दिले गेले होते असा आरोप आहे. आम आदमी पार्टीने मात्र आरोप नाकारले होते. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अनियमिततेमुळे दारू धोरण रद्द केले होते आणि सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने गुन्हाही दाखल केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज