FEMA प्रकरणी हिरानंदानी कंपनी ईडीच्या रडारवर; 5 ठिकाणी छापेमारी…
ED Raid Hiranandani Group : हिरानंदानी ग्रुपच्या 5 ठिकाणच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी (ED Raid Hiranandani Group) केली आहे. FEMA म्हणजेच परकीय चलन विनिमय प्रकरणी हिरानंदानी कंपनी ईडीच्या रडारवर आली आहे. फेमा प्रकरणी ईडीच्या पथकांकडून हिरानंदानी कंपनीच्या पाच कार्यालयांवर छोपेमारी करण्यात आली असून अद्यापही छापेमारी सुरुच असल्याची माहिती समोर येत आहे.
‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी
हिरानंदानी ग्रुपच्या कंपन्या याधीही अनेकदा चर्चेत आल्या होत्या. कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाकडून हिरानंदानी कंपनीच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली होती. ही कारवाई आयकर विभागाकडून 2022 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून हिरानंदानी ग्रुप नेहमीच चर्चेत राहिला आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याल १ लाखाहून अधिक पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
हिरानंदानी ग्रुपची स्थापना 1978 मध्ये निरंजन हिरानंदानी आणि त्यांचे भाऊ सुरेंद्र यांनी केली होती. हिरानंदानी ग्रुपच्या स्थापनेनंतर अलीकडच्या काळातच दोन्ही भाऊ वेगळे झाले आहेत. निरंजन हे हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक असून त्यांची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर्स आहे.
Maratha Reservation : मराठ्यांचं आरक्षण कसं कमी झालं? फडणवीसांनी ‘स्टार्ट टू एन्ड’ सांगितलं
निरंजन हिरानंदानी हे देशातील टॉप 100 अब्जाधीशांपैकी एक आहेत. निरंजन यांची पत्नी त्यांचा व्यवसाय चालवते. निरंजन यांना दोन मुले असून त्यांचा मुलगा दर्शन नवी मुंबई आणि दिल्लीजवळ नोएडा येथे डेटा सेंटर चालवतो. तर निरंजन हिरानंदानी ऊर्जा, इन्फ्रा, नैसर्गिक वायू पाइपलाइन आणि गॅस स्टोरेज टर्मिनल्सच्या बांधकामात गुंतवणूक करत आहेत.