‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी

‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. शिंदे गट आणि भाजपातील धुसफूस समोर आली आहे. खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी उघड शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचे जागावाटपाचे सूत्र आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया किर्तीकर यांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 12 जागा मिळतील अशी जोरदार चर्चा आहे. भाजप 32 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळतील अशी माहिती समोर आली आहे. या जागावाटपावर खासदार किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही काही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही. हे जागावाटप कुठून आले याची मला माहिती नाही. परंतु, हे सूत्र आम्हाला मान्य नाही. 2019 च्या निवडणुकीत आम्ही 22 जागा लढलो होतो. यातील चार जागांवर आमचा पराभव झाला होता. मग असे असताना या बारा जागा कशा घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘मविआसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाहीच’; आंबेडकरांनी खरं सांगून टाकलं

2019 च्या आकडेवारीनुसार आमचा 22 जागांचा दावा आहे. त्या निवडणुकीत भाजपने 26 जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांचे तीन उमेदवार पराभूत झाले होते. तर आमचे चार उमेदवार पराभूत झाले होते. आता आमच्यात एका नवीन सहकाऱ्याची भर पडली आहे. त्यांनाही काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे शिवसेना आणि भाजप दोघांनीही आपल्या कोट्यातून त्यांना समान जागा द्याव्यात, अशाच पद्धतीने जागावाटप झाले पाहिजे, असे किर्तीकर म्हणाले.

दगाफटका होणार नाही याची काळजी घ्या 

जागावाटपात शिवसेनेची भूमिका ठरवताना माझ्याबरोबर असणाऱ्या नेत्यांशी मुख्य नेते चर्चा करत असतील अशी अपेक्षा आहे. पण, तसे होताना दिसत नाही. आम्हाला 12 जागांचा प्रस्ताव मान्यच नाही. आमचे सध्या 13 खासदार आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही एकनाथ शिंदे यांची जबाबदारी आहे. त्यांना दगाफटका होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे असेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.

Pune Loksabha : फडणवीस अन् अजितदादांच्या मर्जीतील काकडे यांनीही लावलाय आता जोर!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube