‘मविआसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाहीच’; आंबेडकरांनी खरं सांगून टाकलं
Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) खरं सांगून टाकलं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा अखेर महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला असून अद्याप जागावाटपावर चर्चा झाली नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे.
U19 World Cup : युवा ब्रिगेडची फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ
आंबडेकर म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटबाबत चर्चा नाही. आमचीही त्यांच्यासोबत अद्याप जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. मी कोणतीही मागणी केलेली नाही. ज्यावेळी महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा सुरु नव्हती त्यावेळी आम्ही 12-12 जागांचा फॉर्मूला दिला होता, सध्या आम्ही कोणतीही मागणी केली नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
Jasprit Bumrah : कसोटी गोलंदाजांतही ‘बुमराह’ नंबर वन; आयसीसीनेच केलं शिक्कामोर्तब
तसेच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर काल निवडणूक आयोगाकडून निर्णय देण्यात आला आहे. राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असल्याचा निर्णय आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं असून ते म्हणाले, शरद पवारांचा पक्ष अन् चिन्ह गेलं आहे ते आहे तिथेच आहेत ना, असं ते म्हणाले आहेत. महाविकासमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु होत नाही, तोपर्यंत कोणाचं वर्चस्व हे आत्ता सांगता येत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, अमरावती या 5 लोकसभा जागांची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर महाविकास आघाडीचे इतर महत्त्वाचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
माविआमधील जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती असून लोकसभेच्या 48 जागांपैकी 34 जागांचे वाटप जवळपास पूर्ण झाल्याचे समजते. मात्र, उर्वरित 14 जागा कोणता पक्ष लढवणार याबाबत अद्यापही चुरस सुरू आहे. ज्या 14 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्यात वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी यांचा समावेश आहे.