Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिला लोकसभेच्या ‘या’ जागांचा प्रस्ताव

Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांनी मविआला दिला लोकसभेच्या ‘या’ जागांचा प्रस्ताव

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आज मुंबईत महाविकास आघाडीची तिसरी बैठक पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज प्रथमच माविआच्या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हजेरी लावली.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाने माविआला बळ मिळणार असले तरी जागावाटपाचा तिढा आणखी वाढू शकतो. कारण प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 5 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा केल्याचे समजते.

‘मला जीवे मारण्याचा डाव’, आव्हाडांनी मारेकऱ्यांचा फोटोच शेअर केला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, अमरावती या 5 लोकसभा जागांची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर महाविकास आघाडीचे इतर महत्त्वाचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

माविआमधील जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती असून लोकसभेच्या 48 जागांपैकी 34 जागांचे वाटप जवळपास पूर्ण झाल्याचे समजते. मात्र, उर्वरित 14 जागा कोणता पक्ष लढवणार याबाबत अद्यापही चुरस सुरू आहे. ज्या 14 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्यात वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी यांचा समावेश आहे.

Lok Sabha 2024 : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून भाजपाचा पराभव करा’; ममता बॅनर्जींचे काँग्रेसला चॅलेंज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज