Lok Sabha 2024 : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून भाजपाचा पराभव करा’; ममता बॅनर्जींचे काँग्रेसला चॅलेंज
Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Lok Sabha Election 2024) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली धुसफूस अजूनही थांबलेली नाही. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये दाखल झाली आहे. बंगालमध्ये आल्यानतंर राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. त्यामुळे राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हिंमत असेल तर इलाहाबाद, वाराणसीत जाऊन भाजपाला पराभूत करा,असे आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिले.
Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, मी सनातन धर्माचा
ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही काँग्रेसला दोन मतदारसंघाचा प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यांनी नकार दिला. आता त्यांनी प्रयागराज आणि वाराणसीत जाऊन भाजपाला पराभूत करून दाखवावं. काही लोक राज्यात फक्त फोटो काढून घेण्यासाठी येतात अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की आम्ही जागावाटपाचा जो प्रस्ताव दिला होता तो काँग्रेसने नाकारला. त्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आता आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने राज्यातील एकूण जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसा प्रस्तावही काँग्रेसला देण्यात आला होता. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली होती अशी माहिती तृणमूल काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली होती.
इंडिया आघाडीला पहिला धक्का! ममता बॅनर्जींची ‘एकला चलो’ची घोषणा, बंगालमध्ये स्वबळावर लढणार
याआधी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात कोलकाता शहरात एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत त्यांनी काँग्रेसवर टीका करत डाव्या पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. डावे पक्ष आघाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी यावेळी केला होता. ज्या लोकांबरोबर मी 34 वर्षे संघर्ष केला त्यांच्या आघाडीतील प्रवेशाला मी सहमती देऊ शकत नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते.