Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा…’

  • Written By: Published:
Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा…’

Mamata Banerjee on Udayanidhi Stalin : तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी शनिवारी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. त्यामुळं सनातन धर्माचे पूर्णपणे निर्मुलन करायला हवं, असं विधान केलं. हाच मुद्दा उपस्थित करून भाजपने विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियावर निशाणा साधत काँग्रेस आणि TMC सारखे पक्ष या विधानावर गप्प का आहेत? असा सवाल केला. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी तामिळनाडूच्या लोकांचा आणि सीएम एमके स्टॅलिनचा आदर करते. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की, प्रत्येक धर्माची आपली भावना असते. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारत ‘विविधतेत एकतेचा’ याचा विचार करतो, जो आपला गाभा आहे. आपण लोकांचा एखादा समूह दुखावला जाईल, अशा कुठल्याही प्रकरणात सामील होणं योग्य नाही.

मी सनातन धर्माचा आदर करते. आम्ही पूजा पाठक करणाऱ्या पुरोहितांना आम्ही पेन्शन देतो. बंगालमध्ये दुर्गापूजा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आम्ही मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्चमध्ये जातो. मला वाटते की आमच्याकडे प्रत्येक धर्माचे लोक असावेत. आणि त्यांचा आपण आदर करावा. कोणत्याही धर्माबाबत टीका करून यये.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर सनातनवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. असे असतानाही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्माच्या नष्ट करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

Talathi online Exam : तलाठी परीक्षेत हायटेक कॉपीचे प्रकार थांबेना! आता अमरावतीतून एकाला घेतलं ताब्यात… 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर राजकीय विरोधकांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवरून जोरदार टीका केली आहे. असे असूनही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते म्हणाले की मी जे काही बोललो ते पुन्हा पुन्हा सांगेल.

दरम्यान, उदयनिधी यांनी सनातन धर्मावर केलेल्या टीकेने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच ‘इंडिया’ आघाडीच्या ममता बॅनर्जींसारख्या महत्त्वाच्या नेत्यांनीही उदयनिधी यांच्या वक्तव्यासंदर्भात बोटचेपी भूमिका घेतल्यानं त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

उदयनिधी यांच्या यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देश दुखावला असल्याचे भाजप नेते दिनेश जयस्वाल यांनी म्हटले आहे. सनातन धर्म शतकानुशतके अस्तित्वात आहे आणि यापुढेही राहील. मुघल आक्रमकांनीही हा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. स्टॅलिनसारखे नेते केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी सनातन धर्माविरुद्ध अशी विधाने करत आहेत, जे अक्षम्य आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube