U19 World Cup : युवा ब्रिगेडची फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ
ICC Under-19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी (ICC Under-19 World Cup 2024 ) केली आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री घेतली. या सामन्यात भारताने 7 चेंडू बाकी (Team India) ठेवत दोन गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 50 ओव्हर्समध्ये 244 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 48.5 ओव्हर्समध्ये 248 धावा केल्या. कर्णधार उदय सहारनला (81) सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भारताने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाचव्या ओव्हरमध्येच दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. सलामीवीर स्टीव्ह स्टोक 14 धावा करून परतला. डेव्हिड टायगरही लवकरच बाद झाला. यानंतर आलेल्या प्रिस्टोरियस आणि रिचर्ड स्लेट्सवेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. यानंतर 76 धावांवर खेळत असताना प्रिस्टोरियस बाद झाला.
Team India : कुणी झोपेत चालतं तर, कुणाला वरिष्ठांचा जाच; टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा आज हॅपी बर्थडे
ऑलिव्हर व्हाईटहेड (22) आणि डेव्हन मरायसने (3) धावा केल्या. कर्णधार जुआन जेम्स याने 24 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मुशीर खाननेही दोन विकेट घेत त्याला साथ दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. सलामीवीर आदर्श सिंह शून्यावरच बाद झाला. चौथ्या ओव्हरमध्ये मुशीर खान फक्त 4 धावा करून बाद झाला. अर्शीन कुलकर्णी याने 12 आणि प्रियांशू मोलियाने 5 धावा केल्या. अशा प्रकारे संघाच्या 32 धावा झालेल्या असतानाच 4 विकेट पडल्या होत्या. येथून पुढे कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी 171 धावांची मोठी भागीदारी केली आणि धावसंख्या 200 च्या पुढे नेली. या दोघांनी पाचव्याा विकेटसाठी भागीदारीचा मोठा विक्रम रचला.
ही भागीदारी क्वान माफाकाने मोडली. शतकासाठी फक्त 4 धावांची गरज असताना सचिन बाद झाला. यानंतर अरावेली रावने 10 केल्या. मुरुगन अभिषेक शून्यावर बाद झाला. त्यामुळे सामना पुन्हा आफ्रिकेच्या बाजूने झुकला. सहारनने मात्र शांत राहत 81 धावा केल्या. त्याचवेळी राज लिंबानीने 4 चेंडूत 13 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांचे वर्चस्व राहिले…