Team India 4 no Batsman : चौथ्या क्रमांकावर यशस्वी खेळणाऱ्या द्रविडला त्याच स्थानासाठी कोच म्हणून एवढा संघर्ष का ?

Team India 4 no Batsman : चौथ्या क्रमांकावर यशस्वी खेळणाऱ्या द्रविडला त्याच स्थानासाठी कोच म्हणून एवढा संघर्ष का ?

Team India 4 no Batsman : भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पुढील चार महिने अत्यंत खास असणार आहेत. कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशिया कप तर ऑक्टोबरमध्ये लगेचच वर्ल्डकप आणि तोही भारतात खेळवला जाणार असल्याने क्रिडारसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यादरम्यान आता एक मुद्दा चर्चेला आला आहे. तो म्हणजे टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आणि चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाचं न सुटणारं कोड. ज्या क्रमांकावर भारताचा कोच राहुल द्रविड इतका यशस्वी झाला आज त्याच क्रमांकासाठी इतका संघर्ष का ? क्रिकेटमधील या चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूला एवढं महत्त्व का ? तसेच या क्रमांकावर कोणते खेळाडू दावा टाकू शकतात.. चला तर जाणून घेऊ…

कांदा खरेदीचा निर्णय ऐतिहासिक, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार

चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूबद्दलचा नेमका वाद काय?

नुकतच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच वक्तव्य केले होते की, भारतीय संघाला युवराज सिंगनंतर नंबर-4 वर एकही चांगला खेळाडू मिळालेला नाही. टीम इंडियाने 2019 पासून या क्रमांकावर अनेक खेळाडूंना आजमावले आहे, फारसे यश मिळवता आले नाही. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. की, त्यावरून चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूवर वादविवाद सुरू झाले आहेत. यावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगूली म्हणाले की, भारताकडे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अनेक खेळाडू आहेत. तसेच एकाच क्रमांकाला एवढ महत्त्व देऊन वर्ल्डकप जिंकता येत नाही.

‘शेतकरी थांबायला तयार पण, केंद्र सरकारने.. कांदाप्रश्नी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला

कारण मी देखील सुरूवातीला मधल्या फळीत खेळलो आणि नंतर ओपनिंग देखील केली. तसंच सचिनचही झालं तो सुरूवातीला सहाव्या क्रमांकावर खेळला पण नंतर त्याने ओपनिंग केली आणि तो जागतिक खेळाडू झाला. असं म्हणत गांगूली यांनी चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूबद्दल आपलं मत मांडलं आहे.

क्रिकेटमधील चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूला एवढं महत्त्व का आहे?

पाहूयात क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या फलंदाजीच्या क्रमात क्रमांक-4 खूप महत्त्वाचा असतो. एक प्रकारे, हा संघ हाताळण्याचा क्रमांक आहे. या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक असते. जर टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली असेल, तर ती गती कायम ठेवत संघाला पुढे नेण्याची जबाबदारी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावर अधिक असते, तर दुसरीकडे टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यास संघाची काळजी घेत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्याची जवाबदारीही त्याच्यावर असते. या क्रमांकावर खेळणारा फलंदाज चेंडूच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा असतो. एकदिवसीय सामन्यांमध्ये या क्रमांकावर भारताकडे चांगल्या फलंदाजाची कमतरता आहे.

दरम्यान आता या चौथ्या क्रमांकावर कोण खेळू शकतं ?

भारतीय संघासमोर सध्या चौथ्या क्रमांकाची मोठी समस्या आहे असं मानलं जात आहे. यासाठी संघाने अनेक खेळाडूंना या क्रमांकावर फांदाजीसाठी आजमावून पण पाहिले. पण या क्रमांकावर जबाबदारीने फलंदाजी करणारा फलंदाज आजतागायत गवसलेला नाही. नुकतेच आशिया कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे या स्थानावर खेळू शकतात. यामध्ये श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांचे नावे आघाडीवर आहे. पण ते किती यशस्वी ठरतील हे येणा-या सामन्यांतून स्पष्ट होईल. आणि आशिया कपमधून भारताला विश्वचषकासाठी परफेक्ट प्लेयिंग इलेव्हन मिळते का हे सुद्धा पाहणं तितकाच महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube