Team India : कुणी झोपेत चालतं तर, कुणाला वरिष्ठांचा जाच; टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा आज हॅपी बर्थडे

Team India : कुणी झोपेत चालतं तर, कुणाला वरिष्ठांचा जाच; टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा आज हॅपी बर्थडे

Team India Cricketers Birthday : भारतीय क्रिकेट टीमसाठी आजचा दिवस (6 डिसेंबर) खूप खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळ करणाऱ्या पाच खेळाडूंचा आज वाढदिवस (Team India Cricketers Birthday) आहे. यातील तीन खेळाडू् टीम इंडियात (Team India) आहेत. एक खेळाडू अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. तर एक खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आजच्या दिवशी वाढदिवस असणाऱ्या खेळाडूंत जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, करुण नायर आणि आरपी सिंह या नावांचा समावेश आहे.

रवींद्र जडेजा

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. आता जडेजा 35 वर्षांचा झाला आहे. 6 डिसेंबर 1988 रोजी त्याचा जन्म गुजरात राज्यातील सौरष्ट्रात झाला. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सन 2009 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिला सामना श्रीलंकेविरोधात खेळला होता. विश्वचषकात जडेजाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. 11 सामन्यात 24.87 च्या सरासरीने आणि 4.25 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत 16 विकेट घेतल्या. सध्या जडेजा कसोटी क्रिकेटमधील एक नंबरचा गोलंदाज आहे. जडेजाने 67 कसोटी सामन्यात 2804 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने 275 विकेट्स घेतल्या आहेत. 197 एकदिवसीय सामन्यात त्यान 2756 रन केले असून गोलंदाजीत 220 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20 मध्ये जडेजाने आतापर्यंत 64 सामन्यात 457 रन आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत.

सुरुवातीच्या काळात स्थानिक क्रिकेट स्पर्धेसाठी जडेजा मुंबईला जात होता त्यावेळी त्याच्या आईला भीती वाटत होती की रात्रीच्या वेळी तो झोपेत असताना रेल्वेतच चालू नये. जडेजाला झोपेत चालण्याची सवय आहे ही गोष्ट फक्त जडेजााची आई आणि त्याच्या बहिणीलाच माहिती होती.

जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता 30 वर्षांचा झाला आहे. 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबाद मध्ये जन्मलेल्या बुमराहने भारतासाठी 30 कसोटी, 89 वनडे आणि 62 टी 20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने अनुक्रमे 129, 149 आणि 74 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्टइंडिज विरोधात 2019 मध्ये त्याने हॅट्रीक मिळवली होती. बुमराह पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता 29 वर्षांचा झाला आहे. अय्यरने भारतासाठी 10 कसोटी, 58 वनडे आणि 51 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 666, 2331 धावा केल्या आहेत. विश्वचषकातही त्याने शानदार प्रदर्शन केले. श्रेयसने एका मुलाखतीत सांगितले होते की ज्यावेळी तो 10 वर्षांचा होता त्यावेळी सोसायटीतील मुलं त्याला खेळू देत नव्हती. जरी खेळायला मिळालं तरी त्याला फिल्डिंगच करायला मिळत होती.

करुण नायर

करुण नायर मूळ कर्नाटकचा आहे. मात्र त्याचा जन्म राजस्थानातील जोधपूर शहरात झाला. आता नायर 32 वर्षांचा आहे. विरेंद्र सहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारा तो फलंदाज आहे. करुण नायरला जास्त संधी मिळाल्या नाहीत. 2017 पासून करुण नायर क्रिकेटपासून लांबच आहे.

आरपी सिंह

आरपी सिंह याचा (RP Singh) जन्म उत्तर प्रदेशातील रायबरेली शहरात झाला. आता तो 38 वर्षांचा आहे. सुरुवातीच्या काळात आरपी सिंहने त्याच्या कामगिरीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले. सन 2006 मध्ये पाकिस्तानविरोधात फैसलाबाद येथील कसोटी सामन्यातून त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता. 2007 मध्ये पहिल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताला विजयी बनवण्यात आरपी सिंहचे मोठे योगदान होते. आरपीने 14 कसोटी सामन्यात 40 विकेट्स घेतल्या. या व्यतिरिक्त 58 वनडे सामन्यात त्याने 69 आणि 10 टी 20 सामन्यात 15 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता आरपी सिंह कॉमेंट्री क्षेत्रात रमला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube