Jasprit Bumrah : कसोटी गोलंदाजांतही ‘बुमराह’ नंबर वन; आयसीसीनेच केलं शिक्कामोर्तब

Jasprit Bumrah : कसोटी गोलंदाजांतही ‘बुमराह’ नंबर वन; आयसीसीनेच केलं शिक्कामोर्तब

Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत (IND vs ENG Test Series) धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर जसप्रित बुमराहला (Jasprit Bumrah) आणखी एक बक्षीस मिळालं आहे. आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये बुमराहने (ICC Test Ranking) प्रथम क्रमांक मिळवला आहे. आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारा बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने 9 विकेट्स घेतल्या होत्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत नव्हती. तरी देखील प्रतिकूल परिस्थितीत बुमराहने अचूक मारा केला आणि 9 विकेट्स घेतल्या. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला. या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर आयसीसीने कसोटी बॉलिंग रँकिंग जाहीर केली. यामध्ये बुमराहने आर. अश्विन, पॅट कमिन्स आणि कागिसो रबाडा या गोलंदाजांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत भारताचा शानदार विजय; बुमराह आणि जैस्वाल ठरले हिरो

या कामगिरीनंतर आयसीसी रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी बिशनसिंग बेदी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा या गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती. त्यानंतर बुमराहने ही कामगिरी करून दाखवली आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा या दोघांनाही मागे टाकले.

या यादीत आर. अश्विन मागील 11 महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम होता. आता मात्र बुमराहने त्याचा पहिला नंबर हिसकावला आहे. बुमराहने 881 रेटिंग पॉईंटस् मिळवले. आयसीसी रँकिंगमध्ये यंदाही भारतीय गोलंदाजाचेच वर्चस्व दिसून येत आहे. यानंतर अन्य संघांच्या गोलंदाजांचा समावेश आहे. बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीचाही फायदा त्याला मिळाला आहे.

Jasprit Bumarh : टीम इंडियाला डबल धक्का! पराभवानंतर बुमराहवर ‘या’ प्रकरणात कारवाई ?

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज