यशस्वी जैस्वालचा ‘डबल धमाका’, बुमराहचा विकेटचा ‘षटकार’; भारताकडे भक्कम आघाडी

यशस्वी जैस्वालचा ‘डबल धमाका’, बुमराहचा विकेटचा ‘षटकार’; भारताकडे भक्कम आघाडी

Yashasvi Jaiswal : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. 78 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बेन स्टोक्स 47 धावा करून बाद झाला. बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. हार्टली 21 धावा करून बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला 143 धावांची भक्कम आघाडी मिळाली.

बुमराहने टीम इंडियाकडून घातक गोलंदाजी करत 6 विकेट घेतल्या. त्याने 15.5 षटकात 45 धावा दिल्या. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 17 षटकांत 71 धावा देत 3 विकेट घेतल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

त्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जसवालने (Yashasvi Jaiswal) धुवांधार फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने इंग्लिश गोलंदाजांना चांगलाच चोप देत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. यशस्वीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुहेरी शतक पूर्ण केले. आज फलंदाजी आल्यानंतर त्याने आक्रमक सुरुवात करत शानदार चौकार मारून द्विशतकाला गवसणी घातली.

Adah Sharma : द केरळ स्टोरी फेम अदा शर्माच्या हटके अदा

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. इंग्लंडचा एकही गोलंदाज त्याच्यासमोर प्रभाव टाकू शकला नाही. या सामन्यात यशस्वीशिवाय एकाही भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. एकापाठोपाठ भारतीय फलंदाज तंबूत परतत होते, तर दुसरीकडे यशस्वी इंग्लिश गोलंदाजांना अगदी सहज खेळत होता. यशस्वी जैस्वालने भारतीय डावाच्या 102 व्या षटकात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले.

बीआर चोप्रांच्या महाभारताची प्रेरणा अन् टोयोटाचा मिनी ट्रक बनला आडवाणींचा रामरथ

खास क्लबमध्ये यशस्वीचा समावेश
या द्विशतकासह यशस्वी जैस्वाल भारताचा चौथा तिसरा डावखुरा फलंदाज ठरला आहे. ज्याने भारतात कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले आहे. भारतात इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळताना द्विशतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा दुसरा डावखुरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात तगडी स्टारकास्ट; रवी काळे साकारणार ‘बहिर्जी नाईक’ यांची भूमिका
भारतामध्ये कसोटीत द्विशतक झळकावणारा डावखुरा भारतीय फलंदाज

विनोद कांबळी – 227 धावा विरुद्ध झिम्बाब्वे, 1993 (दिल्ली)

विनोद कांबळी – 224 धावा विरुद्ध इंग्लंड, 1993 (मुंबई)

गौतम गंभीर – 206 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2006 (दिल्ली)

सौरव गांगुली – 239 धावा विरुद्ध पाकिस्तान, 2007 (बेंगळुरू)

यशस्वी जैस्वाल – 209 धावा विरुद्ध इंग्लंड, 2024 (विशाखापट्टणम)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज