बीआर चोप्रांच्या महाभारताची प्रेरणा अन् टोयोटाचा मिनी ट्रक बनला आडवाणींचा रामरथ
Lal Krishna Advani Ram Rath : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात (Lal Krishna Advani) आला आहे. त्यामुळे राम मंदिर आंदोलनासाठी (Ram Mandir) काढलेल्या ज्या रथयात्रेने आडवाणींना या आंदोलनाचा नायक बनवलं. त्या रथयात्रेतील रथाबद्दल जाणून घेऊ. राम मंदिर आंदोलनासाठी 1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रामरथ ही यात्रा आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मात्र या यात्रेसाठी वापरण्यात आलेल्या रथासाठी कोणतं वाहन वापरण्यात आलं होतं? आणि त्याची खासियत काय होती पाहुयात…
अडवाणींच्या याच रथयात्रेमुळे राम मंदिर आंदोलनाने जोर पकडला होता. आडवाणींच्या रथयात्रेसाठी डीसीएम टोयोटा या मिनी ट्रकचा रथ बनवण्यात आला होता. तर या रथाची डिझाईन ही बीआर चोप्रा यांच्या महाभारत या सिरीयलमध्ये वापरण्यात आलेल्या रथावरून बनवण्यात आली होती.
तर सध्या पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच अडवाणींच्या या रथयात्रेच्या रूपरेषेची आखणी केली होती. कारण १२ सप्टेंबर 1990 मध्ये जेव्हा ही रथयात्रा निघाली होती. त्यावेळी भाजपचे गुजरातचे पक्ष सचिव म्हणून नरेंद्र मोदी काम बघत होते. गुजरातमधील सोमनाथ येथून यात्रा सुरू झाली होती. तर उत्तर प्रदेशातील अयोध्या या ठिकाणी यात्रा समाप्त झाली.
देशाच्या संसदेतही घुमणार “मोदी-मोदी अन् जय श्रीराम”चे नारे; शिवसेना आणणार प्रस्ताव
अगोदर आडवाणींनी ही यात्रा पायी करण्याचे ठरवलं होतं मात्र दिवंगत भाजपनेते प्रमोद महाजन यांनी सांगितले की, हा प्रवास अत्यंत लांबचा आहे. ही यात्रा पायी करणं सोपं नाही. त्याऐवजी वाहनांचा वापर केला जावा. यासाठी महाजन यांनी त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर शांती देव यांना आडवाणींच्या रथयात्रेसाठी रथ निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली. यामध्ये शांती देव यांनी या रथाचे डिझाईन तयार केलं. तर मुंबईतील चेंबूर भागातील नलावडे वर्कशॉप या ठिकाणी प्रकाश नलावडे यांनी या रथाची निर्मिती केली.
या रथाची निर्मिती करणारे प्रकाश नलावडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, ते महाजनांना म्हटले की, मी आत्तापर्यंत अशाप्रकारे रथ निर्माण केलेला नाही. मात्र महाजन म्हटले की, शांती देव तुम्हाला डिझाईन तयार करून देतील त्याप्रमाणे केवळ रथ निर्माण तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी देण्यात आला होता. कारण 25 सप्टेंबरला ही यात्रा सुरू होणार होती आणि 22 सप्टेंबरला आम्हाला हा रथ गुजरातला पाठवणं गरजेचं होतं. महाज नांनी रथ निर्माण करायला सांगितल्यानंतर काही वेळातच वर्कशॉपमध्ये डीसीएम टोयोटा ही मिनी ट्रक पाठवण्यात आली.
Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन
तसेच हा रथ बनवतानाही अनेक आव्हान होती. कारण हा रथ सोमनाथ ते आयोध्या अशा अनेक डोंगराळ आणि खडकाळ भागातून जाणार होता. त्यामुळे तो लाकडी असणं धोकादायक ठरला असतं. त्यामुळे हा रथ पूर्णपणे लोखंडापासून बनवण्यात आला. तर रथासाठी लागणारी प्रत्येक वस्तू ही तात्काळ उपलब्ध करून दिली जात होती.
त्याकाळी बी आर चोप्रा यांची महाभारत ही सिरीयल चर्चेत होती. त्यामुळे रथ म्हटलं की लोकांना त्यापुढे घोड्यांची कल्पना यायची. त्यामुळे डिझायनर शांती देव यांनी रथाच्या पुढे घोड्याच्या जागेवर दोन सिंहांचे आकार बनवण्याचे ठरवलं. रथयात्रे दरम्यान हा रथ प्रत्येकाच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत होता. मात्र जेव्हा या रथाची निर्मिती होती. त्याचवेळी अनेक लोक रथ बघण्यासाठी वर्कशॉपलाही भेट देत होते. तसेच भाजपचे नेते प्रमोद महाजन, मुरली मनोहर जोशी हे वेळोवेळी कामाची पाहणी करत होते. अखेर कठीण परिश्रमानंतर अवघ्या दहा दिवसांत या डीसीएम टोयोटा मिनी ट्रकचं आडवाणींच्या सुंदर अशा रथामध्ये रूपांतर झालं.