Jasprit Bumarh : टीम इंडियाला डबल धक्का! पराभवानंतर बुमराहवर ‘या’ प्रकरणात कारवाई ?

Jasprit Bumarh : टीम इंडियाला डबल धक्का! पराभवानंतर बुमराहवर ‘या’ प्रकरणात कारवाई ?

IND vs ENG : भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावला (IND vs ENG) आहे. त्यानंतर आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि फलंदाज केएल राहुल (KL Rahul) या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयने एका (BCCI) निवेदनात ही माहिती दिली आहे. तसेच या सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) याला एका प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे. नियम मोडल्याप्रकरणी आयसीसीने त्याला दोषी धरले आहे.

IND vs ENG: फिरकीचा डाव भारतावरच उलटला ! हैदराबाद कसोटीत इंग्लंडने हरविले

पहिल्या कसोटी सामन्यात 81 वी ओव्हर टाकण्यासाठी बुमाराह आला होता. यावेळी इंग्लंडचा पोप फलंदाजी करत होता. तो फलंदाजी करत असतानाच बुमराह त्याच्या वाटेत आला. त्यामुळे दोघांत धडक झाली. या प्रकरणात आयसीसीने बुमराहला दोषी धरले आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.12 नुसार हे नियमाचे उल्लंघन आहे. या नियमात असे म्हटले आहे की जर एखादा खेळाडूचा दुसऱ्या खेळाडू किंवा पंचांना शारिरीक अडथळा झाला तर त्याला दोषी ठरवले जाते. या प्रकरणात बुमराह दोषी आढळला असला तरी त्याच्यावर बंदी किंवा आर्थिक दंड अशी कारवाई झालेली नाही. कारण मागील दोन वर्षात त्याच्याकडून पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. मात्र त्याला एक डिमेरीट गुण देण्यात आला आहे.

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल संघाबाहेर

दरम्यान, दुसरी कसोटी येत्या 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
रवींद्र जडेजा, केएल राहुल हे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. या दोघांचा जागी तीन खेळाडू संघात सहभागी करून घेण्यात आले आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचाही (Washington Sundar) संघात प्रवेश झाला आहे. तो भारतासाठी सहा कसोटी सामने खेळला आहे. फिरकीपटू सौरभ कुमारला (Saurabh Kumar) संघात सहभागी झाला आहे. तो पूर्वीही भारतीय संघात होता. परंतु तो सामन्यात खेळलेला नाही. आवेश खानचाही संघात समावेश करण्यात आले आहे. तो सध्या मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीत खेळत आहे. गरज पडल्यास तो कसोटी सामना खेळेल.

IND vs ENG: ऑली पोपचं चिवट शतक! इंग्लड संघाचा जबरदस्त पलटवार, उडवली भारताची झोप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube