Jasprit Bumrah Surgery : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, जसप्रीत बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी
नवी दिल्ली : होळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय संघाला एक मोठी बातमी मिळाली आहे. (Jasprit Bumrah Successful Surgery) टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. न्यूझीलंडमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली. (ODI World Cup 2023) आता या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत बुमराह यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेनंतर आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये त्याच्या सहभागाच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, बुमराहला मैदानात परतण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही.
Team India Holi Celebration : ‘रंग बरसे’ गाण्यावर कोहली, रोहितचा ढासू डान्स; अशी साजरी केली धूळवड
पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह आधीच आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. आता त्याच्यासमोर विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा आहे. 2023 मध्ये, 50 षटकांचा विश्वचषक ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाईल. असं असलं तरी पाठीच्या समस्येपासून सुटका व्हायला खूप वेळ लागतो. बुमराहला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी चार आठवडे लागतील, असे अधिकृतपणे सांगितले जात आहे. परंतु पुनर्प्राप्ती प्रक्रिया लांब आहे. कारण बरे झाल्यानंतर पुनर्वसन सुरू होईल, ज्याला तीन ते पाच महिने लागू शकतात. अशा स्थितीत बुमराहसमोर विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होण्याचे कठीण आव्हान आहे.
बुमराहची न्यूझीलंडमध्ये याच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर उपचार करण्यात आले. त्याचवेळी न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडनेही या डॉक्टरकडे उपचार घेतले होते.