IND vs ENG: फिरकीचा डाव भारतावरच उलटला ! हैदराबाद कसोटीत इंग्लंडने हरविले
IND vs ENG 1 Test : हैदराबाद येथील कसोटी ( Hyderabad Test सामन्यात इंग्लंडने भारताला (India) 28 धावांनी पराभूत केले आहे. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज अपयशी ठरले आहेत. इंग्लंडच्या कसोटी संघात पर्दापण करणाऱ्या टॉम हार्टलीने (Tom Hartley) भारतीय फलंदाज/strong> आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. हार्टलीने भारताचे सात फलंदाज बाद करत कसोटीच्या चौथ्या दिवशी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विजयासाठी 231 धावांची आवश्यकता असताना भारतीय संघ 202 धावांत गारद झाला.
Chhagan Bhujbal : ‘सरकारकडून आता हट्ट पुरवण्याचे काम सुरू’; भुजबळांची स्पष्ट शब्दांत नाराजी
पहिल्या दोन दिवसांत कसोटीवर भारताचे वर्चस्व होते. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 246 धावांत गारद झाला होता. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत पहिल्या डावात 436 धावा उभारल्या होत्या. पण दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांनी जेरीस आणले. ओली पोपने 196 धावांची जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडला 420 धावांपर्यंत नेले होते. परंतु दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकीसमोर अपयशी ठरले. टॉम हार्टली हा तर कर्दनकाळच ठरला. त्याने सात बळी घेतल्याने भारतीय संघ 202 धावांवर गारद झाला. हार्टली व्यतिरिक्त जो रुट आणि जॅक लीचने प्रत्येकी एक बळी घेतला.
Nitish Kumar : आमदारांच्या बैठकीतच PM मोदींचा फोन; चर्चा केली अन् राजीनामाच दिला
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडचा अर्धासंघ 163 धावांवर तंबूत परतला होता. त्यामुळे हा सामना भारत सहज जिंकेल असे वाटत होते. परंतु ओली पोपने एका बाजूने चिवट खेळीचे प्रदर्शन केले. त्याच्यासमोर भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकी फलंदाज खास काही करू शकले नाही. शानदार खेळत असलेल्या पोपला मात्र द्विशतक झळकविता आले नाही. तो 196 धावांवर बाद झाला. या व्यतिरिक्त बेन फोक्स आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी 34 धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 42 धावांची भागिरदारी केली. यशस्वी जैस्वाल हा पंधरा धावांवर तंबूत परतला. तर रोहित शर्मा 39 धावा करू शकला. इतर फलंदाज मात्र डाव सावरू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिलही शून्यावर बाद झाला. श्रीकर भरत आणि रवीचंद्रन अश्विन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तेही प्रत्येकी 28 धावांवर बाद झाले.