IND vs ENG : पहिला दिवस भारताने गाजविला! जैस्वालने इंग्लिश गोलंदाजी फोडून काढली
IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या (INDIA) नावावर राहिला. फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा (England) पहिल्या डाव अडीचशे धावांच्या आत आटोपला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswall) इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. कसोटीतही जैस्वालने एकदिवसीय क्रिकेटसारखी खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर एक गड्याच्या मोबदल्यात भारताने 23 षटकांत 119 धावांपर्यंत मजल मारली आहे.
अजित पवारांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद; त्यांनी आधी पार्थला…; खडसेंचा खोचक टोला
यशस्वी जैस्वाल हा 76 धावांवर, तर शुबमन गिल हा 14 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा 24 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. यशस्वी जैस्वालने मात्र इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. त्याने 70 चेंडूत 76 धावा केल्यात. त्याने तब्बल नऊ चौकार आणि तीन षटकार मारले.
सर्व्हेचं नाटकच, सरकार क्रूर पद्धतीने खेळतंय; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचा घणाघात
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने 55 धावांची भागिदारी केली. बेन डकेटने 39 चेंडूत 35 धावांची खेळी. त्याने तब्बल सात चौकार मारले. डकेटला रवीचंद्रन अश्विनने बाद केले. त्यानंतर मैदानात आलेल्या ऑली पॉपही केवळ एका धावेवर तंबूत परतला. त्याला रवींद्र जडेजाने बाद केले. जॅक क्रॉलीही 20 धावांवर बाद झाला. एकवेळ इंग्लंडच्या बिनबाद 55 धावा अशी स्थिती होती. परंतु अवघ्या पाच धावांवर इंग्लंडचे टॉपचे तिन्ही फलंदाज बाद झाले. त्यामुळे तीन बाद 60 अशी इंग्लंडची परिस्थिती निर्माण झाली.
जो रुट आणि जॉनी बेयरस्टोने डाव सांभाळत 108 धावांपर्यंत मजल मारली. जॉनी बेयरस्टोने 58 चेंडूत 37 धावा केल्या. जो रूट 29 धावांवर बाद झाला. बेन फॉक्स 4 आणि रेहान अहमद 13 धावांवर बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण करणाऱ्या टॉम हार्टलेने 23 धावांची खेळी केली. तिसऱ्या सत्रात बेन स्टॉक्सने जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्याने 88 चेंडूत 70 धावांची खेळी केली. त्यात आठ चौकार आणि तीन षटकार मारले. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विने प्रत्येकी तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने 12 षटकांत 80 धावा जोडल्या. रोहितला शर्माला जॅक लीचने बाद केले.